प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गुत्थीच्या व्यक्तिरेखेने प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे. सुनील ग्रोव्हर सध्या कलाविश्वापासून दूर आहे, पण आजही तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. अभिनयासोबतच सुनील सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपल्या मजेदार व्हिडिओंद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. या पावसाच्या दिवसात सुनीलचा रस्त्यावर बसून छत्री विकतानाचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याची ही अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे की नेमकं काय करत आहे.
[read_also content=”व्हॉट्सॲपमध्ये पाच नवीन भन्नाट फिचर्स आले आहेत! आताच करा अपडेट आणि वापरायला सुरुवात करा https://www.navarashtra.com/lifestyle/whatsapp-new-feturs-for-iphone-users-nrps-436175.html”]
सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, यातील एका फोटोमध्ये तो भर पावसात छत्री विकताना दिसत आहे. या फोटोला त्याने “एवढ्या पावसात माझी स्वत:ची छत्रीदेखील विकली गेली”, असं कॅप्शन दिलं आहे. याबरोबरच त्याने आणखी एक व्हिडिओही शेअर केला आहे. एक महिला त्याच्या कडून छत्री विकत घेताना दिसत आहे. आजूबाजूचे लोक सुनीलला पाहत असल्याचे आश्चर्यचकित होत असल्याचं दिसत आहे.
सुनील ग्रोव्हरच्या या फोटोवर कमेंट करून यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘भाईची स्थिती कशी आहे?’ त्याचवेळी दुसरा चाहता लिहितो, ‘सर क्या हाल बना रखा है, कुछ लेते नहीं. एकाने लिहिले, ‘किती काम बदलणार भाऊ, व्यवसायाला वेळ द्या.’ सुनील ग्रोव्हरच्या या फोटोवर अशा अनेक कमेंट येत आहेत.
एक दिवसापुर्वी सुनील ग्रोव्हरचा कणीसं विकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हातगाडीवर बसून कणीसं भाजताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.