(फोटो सौजन्य - Instagram)
‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्री नितांशी गोयल ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर चमकताना दिसली आहे. यासोबतच, ती वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर चालणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. नितांशीचा काळ्या ऑफ शोल्डर गाऊनमधील लुक व्हायरल होत आहे. नितांशीने सोशल मीडियावर तिच्या छायाचित्रांसह एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने कान्समध्ये पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्रीचा लुक पाहून चाहते चकित झाले आहेत.
Vicky Birthday: विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त वडील शाम कौशल यांची खास पोस्ट, व्हिडिओ करत म्हणाले…
नितांशीने इंस्टाग्रामवर तिचा आनंद व्यक्त केला
कान्सच्या रेड कार्पेटवरील पदार्पणाबद्दल उत्साहित असलेल्या नितांशीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये नितांशीने लिहिले की, “मी कान्समध्ये रेड कार्पेटवर चालले. हे सांगणे अजूनही स्वप्नासारखे वाटते आहे. या व्यासपीठावर भारतीय चित्रपटांचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे जो मी नेहमीच जपून ठेवेन. माझ्या कुटुंबाला, माझ्या टीमला, माझ्या प्रेक्षकांना – माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. हा फक्त माझा क्षण नाही, तर स्वप्न आहे.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.
अभिनेत्री काळ्या गाऊनमध्ये चमकली
नितांशी गोयल ‘डोजियर १३७’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी कान्समध्ये पोहोचली होती. कान्समध्ये पदार्पण करताना नितांशी मोनिका आणि करिश्मा यांनी डिझाइन केलेल्या काळ्या ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये दिसली. ज्यावर जड सोनेरी नक्षीकाम केलेले दिसले. तिला कान्ससाठी श्रेय आणि ऊर्जा यांनी स्टाईल केले होते. नितांशीने चोकर नेकलेस, स्टड इअररिंग्ज आणि एक सुंदर हेअरस्टाइलने अभिनेत्रीने स्वतःचा लुक परिपूर्ण केला.
समांथा प्रभूचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट…
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींना श्रद्धांजली
नितांशीच्या रेड कार्पेट लुकव्यतिरिक्त, तिचा पारंपारिक भारतीय लुकही सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिने सुंदर साडी परिधान करून भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींना आदरांजली वाहिली. खरंतर, अभिनेत्रीने केसांमध्ये एक सुंदर केसांची ॲक्सेसरी घातली होती. ज्यामध्ये एक मोत्याचा हार होता आणि त्याला लहान फ्रेम्स जोडलेल्या होत्या. या फ्रेम्समध्ये मधुबाला, रेखा, श्रीदेवी, वैजयंतीमाला, हेमा मालिनी, वहिदा रहमान आणि नूतन यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींची छायाचित्रे दिसत आहे. नितांशीचा हा लुक व्हायरल झाला आणि लोकांना तो खूप आवडला.