आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या अफवाच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. नुकतीच आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी अलीकडेच त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि अभिनेत्री तिच्या दुहेरी-डायमंडची अंगठी दाखवताना एक फोटो शेअर केला आहे.
लग्नाच्या बातम्यांदरम्यान, अभिनेत्रीने आता एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे आदितीने चाहत्यांना सांगितले की, तिचे लग्न झालेले नसून सिद्धार्थसोबत तिचा साखरपुडा झाला आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करताना अदिती राव हैदरी हिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तिने हो म्हणाली… एंगेज्ड’. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बातमी ऐकून चाहते आनंदी झाले आहेत आणि या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
लोकांनी अभिनेत्रीचे अभिनंदन केले.या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला आहे. एका यूजरने लिहिले, ‘पिक्चर परफेक्ट. शुभेच्छा.’ आणखी एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, ‘हे दोघे एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.’ अदितीच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘थोडे दुखले पण अभिनंदन.’
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थची पहिली भेट ‘महा समुद्रम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची मैत्री झाली. नंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लग्नाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.






