गेल्या काही दिवसात मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकरांनी या जगाचा निरोप घेतला. काही दिवसापुर्वी टिव्हीवरील प्रसिद्ध चेहरा अभिनेता ऋतुराज सिंग यांचा कार्डियक अरेस्टनं निधन झालं होतं. आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. झनक आणि कुमकुम भाग्य सारख्या शोमधून आपल्या अभिनयानं घरारात पोहोचलेली अभिनेत्री डॉली सोहीचं निधन (Actress Dolly Sohi Passes Away) झालं आहे. दीर्घकाळापासून डॉलीची कर्करोगाशी झुंज सुरु होती, अखेर ही झुंज अपयशी ठरली असून तिनं आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. दु:खद म्हणजे डॉली सोहीच्या मृत्यूपूर्वीच तिची धाकटी बहीण अमनदीप सोही हिचाही काविळीमुळे मृत्यू झाला होता.
[read_also content=”हे माझे पहिलंच लग्न! दुसऱ्या लग्नाबाबत स्पष्ट बोलला राखीचा Ex Husband https://www.navarashtra.com/movies/rakhi-sawant-ex-husband-adil-khan-open-up-abou-his-second-marriage-nrps-513615.html”]
डॉली सोहीच्या कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या निधनाची माहिती न्यूज पोर्टल ई-टाइम्सवर शेअर करत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी लिहिले, “आमची मुलगी डॉलीचे आज सकाळी निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने आम्हाला पूर्ण धक्का बसला आहे. आज तिच्यावर अंतिम संस्कार केले जातील.”
भाभी, कलश, देवो के देव-महादेव सारखे शो करणारी अभिनेत्री डॉली सोही (डॉली सोही डेथ) बऱ्याच दिवसांपासून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने त्रस्त होती, तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पहिल्या मुलीच्या, अमनदीप सोहीच्या मृत्यूपासून त्यांचे कुटुंब अद्याप सावरले नव्हते, तेव्हा अचानक त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
डॉली सोहीच्या भावाने सांगितले की, अभिनेत्रीची धाकटी बहीण अमनदीप सोही हिचा एक दिवस आधी मृत्यू झाला होता. तिला कावीळ झाला होता. पण डॉक्टरांकडून काही तपशील घेण्यासाठी आम्ही त्या मानसिक स्थितीत नव्हतो.” डॉलीप्रमाणेच तिची धाकटी बहीण देखील अभिनेत्री होती.