मनोरंजन सृष्टीतील कलाकार सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ते शेअर करत असताात. त्यांना सोशल मीडियावर फॅालो करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येत असते. सेलेब्रिटिंच्या पोस्टवर कमेंट करणं तशी सामन्य बाब पण त्यांना मेसेज करुन धमकी देण्यासाठी गंभीर घटना अलीकडेच घडली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरीला (Jui Gadkari) इन्स्टाग्राम वर धमकीने भरलेला मेसेज आला आहे. एका तरुणीने अभिनेत्रीला मेसेज करत तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊयात…
read_also content=”मुंबईला न जाता ‘या’ ठिकाणी तीन दिवस होता गुरुचरण सिंग, नतंर फोन झाला नॅाट रिचेबल अन्… https://www.navarashtra.com/movies/gurucharan-singh-was-seen-in-delhi-palam-after-he-lest-home-to-go-to-mumbai-nrps-528578.html”]
अभिनेत्री जुई गडकरीला इन्स्टाग्रामवर साडेतीन लाखांहून अधिक लोक फॅालो करतात. तिच्या फोटोंना लाईक कमेंट करतात. पण सेलिब्रिटींना प्रत्येकाला इन्स्टाग्रामवर फॅालोबॅक करणं शक्य नसतं. ही अत्यंत साधारण बाब आहे पण यावरुन एका युझरने जुईला धमकीने भरलेला मेसेज केला आहे.
नुकतचं जुईने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर केला आहे. एका तरुणीने जुईला धमकीचा मेसेज पाठवला आहे. संबंधित तरुणी जुईला धमकीचे मेसेज करत लिहिते, “काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. तू फॉलो कर नाहीतर तुला जेल मध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण, आम्हाला वाटलं तू फॉलो करशील. पण, तू फॉलो केलं नाहीस आता तुला पोलिसात टाकेन…मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं कुठेही पळायचं नाही.”
तरुणीने जुईला धमकी दिल्यानंतर जुईही गप्पा बसली नाही. तीने त्या तरुणीला जशास तसं उत्तर दिलं आहे. जुई स्टोरी शेअर करत म्हणाली की, मी सहन करू शकत नाही. आता थेट पोलीस स्टेशनला भेटूच मग आपण…राखी सुतार तू फेमस झाली. येच कर्जतला बघतेच मी पण!” जुईने तरुणीला उत्तर दिल्याने सोशल मीडियावर नेटीझन्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. सेलिब्रिटींसोबत घडणारे हे प्रकार गंभीर असून त्याला आळा घालायला हवा असा सूर उमटू लागला आहे.