(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेतून प्रत्येक स्त्रीतील सामर्थ्य, करुणा आणि जिद्द जागी होते. या दिवसांत भक्ती, नृत्य आणि आनंदाचा जल्लोष असतो, पण त्यासोबतच स्त्रीशक्तीचं तेज साजरं करण्याची संधी मिळते. प्रत्येक स्त्री हीच देवीचं रूप आहे, आणि नवरात्र म्हणजे त्या रूपाला सलाम. ‘सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेतील अवंती म्हणजेच अभिनेत्री पूजा रायबागीने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग चाहत्यांसह शेअर केला आहे.
अभिनेत्री पूजा रायबागी म्हणाली की, “आपली आई हीच आपल्यासाठी दैवत आहे. आज मी जी काही माझ्या पायावर कणखरपणे उभी आहे हे सारंकाही तिच्यामुळे शक्य झालं. माझी आई सिंगल पॅरेंट असल्यामुळे माझा आणि माझ्या भावाचा सांभाळ, शिक्षण, स्वतःच घर घेणं हे सगळं तिने एकटीने केलं आहे. लहानपणापासून मी तिचा संघर्ष जवळून पाहिला आहे. प्रत्येक अडचणींवर मात करत तिने आम्हाला घडवलं. कोणत्याच गोष्टीची कमी तिने भासवून दिली नाही. माझी आईच माझा बापही आहे. त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो आणि माझ्यासाठी ती ऊर्जा आहे. याचबरोबर आज प्रत्येक स्त्रीने स्वतःमधली एक कला जोपासायला हवी. स्त्री मध्ये इतकी शक्ती आहे की, ती जी कोणती गोष्ट ठरवेल ती सगळी स्वप्न ती पूर्ण करू शकते. ही स्त्रीची ताकद आहे.”
बादशाह झाला जखमी, डोळ्यावर दिसली बांधलेली पट्टी; फोटो पाहून चाहते चकीत
यापुढे ती म्हणाली की, “गावखेड्यातील स्त्रियांना आजही बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत पण स्त्रीने खंबीर राहायला हवं. अन्यायविरोधी आवाज उठवणं महत्त्वाचं आहे. नव्या पिढीच्या मुलींना मला सांगायला आवडेल की, त्यांनी त्यांच्या आई- बाबांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधायला हवा. मित्र मैत्रिणी प्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या सोबत शेअर करा. यामुळे सध्याची परिस्थिती नक्कीच बदलू शकते. प्रत्येकाने हसत रहा, स्वप्नांचा पाठलाग करून ती स्वप्न सत्यात उतरवा.”अशी भावना अभिनेत्री पूजा रायबागी हिने व्यक्त केली आहे.
अक्षय कुमारचा ‘Jolly LLB 3’ १०० कोटींपासून इतका दूर, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
सन मराठी वाहिनीवर सध्या लोकप्रिय ठरत असलेली मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. ही मालिका सावी आणि धैर्य या नवदांपत्याच्या नात्यातील संघर्ष, प्रेम आणि समजूतदारपणाच्या प्रवासावर आधारित आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम देखील मिळत आहे.