मुंबई : सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. काही दिवसापुर्वी अभिनेत्री पुजा सांवतने गुपचुप साखरपुडा करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला होता. फेब्रुवारीमध्ये पुजा सिद्धेश पवारसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे अभिनेता प्रथमेश परबही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आता सोशल मीडियवार मलिका विश्वातील लोकप्रिय सुंदर अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि हॅन्ससम अभिनेता अंजिक्य ननावरे यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. मराठी सिनेसृष्टीमधील आणखी एक सेलिब्रिटी जोडपं लग्नबंधानात अडकलं (Shivani Surve Ajinkya Nanware Marriage)आहेत. अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) यांनी लग्न केलं आहे. सध्या सोशल मीडियाच्या त्यांच्या लग्नाचे फोटो देखील समोर आले आहेत. सेलेब्रिटींसह चाहतेही या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
[read_also content=”’12वी फेल’ विक्रांत मेसीचं नशीब चमकलं, राजकुमार हिरानीच्या पहिल्या वहिल्या वेबसिरीजमध्ये झळकणार! https://www.navarashtra.com/movies/vikrant-massey-is-in-leas-role-of-vidhu-vinod-chopra-upcoming-web-series-nrps-503956.html”]
गुरुवारी शिवानी आणि अंजिक्यने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि प्रेमाचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. लग्नाच्या पेहरावात दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. शिवानीने गुलाबी रंगाला लेहंगा तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळतंय.
शिवानी-अजिंक्यची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या सेटवर हाय-हॅलो करण्यापर्यंतच शिवानी आणि अजिंक्यची मैत्री होती. मालिका संपल्यानंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. तसेच मैत्रीपलीकडे काहीतरी आहे, असं त्यांना वाटलं आणि ते पुन्हा एकमेकांना भेटू लागले. 2016 पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाला सुरुवातीला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. आता त्यांनी लग्न करत त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.






