(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Rhea Chakraborty 2020 Drug Case: मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट कायमचा परत करण्याचे निर्देश एनसीबीला दिले आहेत.तसेच, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित २०२० च्या ड्रग्स प्रकरणातील जामीनाच्या अटींमध्ये सवलत देण्याची याचिकाही मान्य केली आहे. हा निर्णय रियासाठी मोठा दिलासा ठरला आहे, तिला 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अनपेक्षित मृत्यूनंतर सुरू झालेल्या ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती.
सप्टेंबर २०२० मध्ये अटक केल्यानंतर आणि पुढील महिन्यात जामीन मिळाल्यानंतर, रियाला विदेश प्रवासासाठी दर वेळी आपला पासपोर्ट एनसीबीकडे सादर करावा लागला आणि कनिष्ठ न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!
रिया चक्रवर्ती हिच्या वकिलाने जोरदार युक्तीवाद केला. ते म्हणाले की, “तिला कामासाठी परदेशात जावे लागते आणि पूर्व परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांना काम सोडून द्यावे लागले. त्यामुळे आर्थिक चणचणही भासली.” तसेच या प्रकरणात आठ सह-आरोपींनाही सवलत देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?
विरोधी वकिलांनी आक्षेप घेतला की, रिया चक्रवर्ती हिला विशेष वागणूक देऊ नये. कारण ती एक सेलिब्रिटी आहे. ती देशात परत येऊ शकत नाही. पळून जाण्याचा धोका आहे.तथापि, न्यायमूर्ती नीला गोखले म्हणाल्या की इतर आरोपींनाही याच प्रकारची सवलत दिली गेली आहे आणि रियाने खटल्यात सहकार्य केले आहे. प्रत्येक परवानगी असलेल्या परदेश दौऱ्यानंतर परतले आहेत आणि कधीही त्यांच्या जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले नाही, असे नमूद केले. ” खटल्याच्या निकालापर्यंत तीच्या उपस्थितीवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही” असं न्यायालयाने म्हटलं आहे.