दीपिका ऐश्वर्याची भावनिक गळाभेट
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे झालेले तारांकित लग्न हे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर प्रत्येक मिनिटाला एक नवीन व्हिडिओ समोर येत आहे, आणि आपले आवडते सेलिब्रिटी पाहून चाहतेही खूप खुश होत आहेत. बॉलीवूडपासून ते हॉलिवूडच्या तारकांनी या शाही लग्नाला हजेरी लावत या शाही लग्नाची शान वाढवली.
किम कार्दशियन, जॉन सीना ते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे स्टार्स अनंत-राधिकाच्या लग्नाचे साक्षीदार झाले. लवकरच होणारी आई दीपिका पादुकोणही आपली आई उज्जालासोबत अनंत-राधिकाच्या लग्नाला पोहोचली होती. अनंत-राधिकाच्या लग्नाचा ऐश्वर्या आणि दीपिकाचा एक सुंदर व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/X)
ऐश्वर्या आणि दीपिकाची मैत्री
ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोण यांनी एकही चित्रपट एकत्र केला नाही, पण दोघीही एकमेकांचा खूप आदर करतात. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नात ऐश्वर्याने खास हजेरी लावली होती. तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात चाहत्यांना त्यांचे हे प्रेम पुन्हा पाहायला मिळाले. दीपिकाला पाहताच ऐश्वर्याने दीपिकाला खूप वेळ गोड मिठी मारली. यावेळी ऐश्वर्या भावूक झालेली दिसून आले आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये
BABIES🥹♥️ Aishpika✨ https://t.co/1ijy5XuTWh pic.twitter.com/gwVy6wTcaT
— 🍉hannan (@daperfectDP) July 13, 2024
व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिकाची पाठमोरी दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याचा चेहरा दिसत आहे, ज्यामध्ये ती काहीशी भावूक झालेली दिसून येत आहे. दोन्ही बॉलीवूड स्टारच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये हृतिक रोशनही दीपिका आणि ऐश्वर्याच्या बरोबरीने उभा दिसत आहे. ऐश्वर्याने दीपिकाला खूप वेळ मिठी मारली असून तिचा भावूक चेहरा दिसून येतोय.
सप्टेंबरमध्ये दीपिका देणार बाळाला जन्म
दीपिका पादुकोण आणि तिचा नवरा रणवीर सिंग पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत. सप्टेंबरमध्ये अभिनेत्री तिच्या पहिल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहे. अभिनेत्रीने मार्चमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. या जोडप्याने त्यांच्या गरोदरपणाची घोषणा करताच त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र, दीपिका तिच्या बेबी बंपमुळे अनेकदा ट्रोलही झालेली दिसून आली आहे. पण, या सगळ्यातही ती सकारात्मकतेने बाळंतपण एन्जॉय करताना दिसून येत आहे.