बॅालिवुडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) चित्रपटांव्यतिरिक्त खासगी आयुष्यासाठीही नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावरही फार अॅक्टिव्ह असतो. नुकतंच त्याने पत्नी ट्विंकल (Twinkle Khanna) खन्नासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने पत्नी ट्विंकलचं खास कौतुक केलं आहे. फिल्मी दुनियेपासून दूर राहणाऱ्या ट्विंकलने वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर होण्याचा मान पटाकवला आहे. तिला पदवी मिळाल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.
[read_also content=”मुंबईत ‘प्रसिद्ध’ रेस्टारंटमधून मागवलेल्या जेवणात आढळला उंदीर, जेवल्यानंतर व्यक्ति रुग्णालयात दाखल! https://www.navarashtra.com/maharashtra/dead-rat-found-in-food-order-from-bbq-by-a-man-in-mumbai-man-rush-to-the-hospital-after-etaing-food-nrps-498763.html”]
वयाच्या पन्नाशीत असलेल्या ट्विंकलनं लंडन विद्यापिठात शिक्षण घेत होती. तिनं लंडन विद्यापीठात पिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्रेममध्ये तिने प्रवेश घेतला. सध्या तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. त्याचा पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अभिनेता अक्षयनं देखील हजेरी लावली होती. त्यांनतर अक्षयनं पत्नी ट्विंकलचं कौतुक करत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.
अक्षय कुमारने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला अभ्यास करण्याबद्दल सांगितलं त्यावेळी मला खरचं आश्चर्य वाटलं होतं. पण अभ्यासाच्या वेडापायी तू घेत असलेली मेहनत पाहून मला वाटलं की मी एका सुपरवुमनसोबत लग्न केलं आहे. घर, करिअर आणि मुलांकडे लक्ष देण्यासोबत तू विद्यार्थी म्हणूनदेखील चांगली कामगिरी केली आहेस. मीदेखील अभ्यास केला असता तर मला अधिक चांगल्या शब्दात तुझ्याबद्दलचा अभिमान व्यक्त करता आला असता. टीना…खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम”.
अक्षय कुमारच्या वर्क प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं तर, त्याचा ‘बडे मिया छोटे मिया’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात खिलाडी टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यांतर तो स्काय फोर्स आणि सिंघम 3 मधूनही रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.