पुणे भाजपमध्ये नाराजीचा सूर (फोटो- सोशल मीडिया)
पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
पक्ष नेतृत्वावर व स्थानिक आमदारांवर कार्यकर्त्यांचा रोष
तीन आयात नवख्या उमेदवारांना देण्यात आली संधी
हडपसर: हडपसर भागात अनेक प्रभागात निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजप पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून अनेक दिग्गज पक्ष श्रेष्ठी,आमदारांवर नाराजी व्यक्त केली. महंमदवाडी प्रभागातील भाजपाचे माजी नगरसेवक संजयतात्या घुले यांना पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने येथील प्रभागात भाजप पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून पक्ष नेतृत्वावर व स्थानिक आमदारांवर (Pune News) रोष व्यक्त करीत आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत महंमदवाडी प्रभागात भाजप पक्षाचे संजयतात्या एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महंमदवाडी-उंड्री ४१ प्रभागात भाजपाचे अनेक इच्छुक उमेदवार होते, भाजप माजी नगरसेवक संजयतात्या घुले, स्वाती कुरणे,कार्तिकी घुले,शोभाताई लगड,प्रमोद कुरणे,राजेंद्र भिंताडे ,बाळासाहेब घुले, प्रमोद सातव ,माजी नगरसेविका विजया वाडकर असे अनेक दिग्गजांनी निवडणुक लढविण्याची तयारी केली होती.
येथील प्रभागात जीवन जाधव सोडले तर तीन आयात नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. हडपसर मधील प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेले सात आठ वर्षांपासून भाजप पक्षाचे प्रामाणिक पणे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहचविणारी भाजपाची निष्ठावंत कार्यकर्ती स्मिता तुषार गायकवाड यांना ही पक्षाने उमेदवारी दिली नाही,जे पक्षाचे बारा महिने प्रोग्राम व विविध कार्यक्रम राबवितात अशांना उमेदवारी देण्यात आली नाही पक्षाने अन्याय केला असल्याचे सांगण्यात येते.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजप पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांना ही भाजप पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने पक्षाचा एक प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता दुखावला आहे, याच प्रभागात भाजपाचे विविध पदे भूषविणारे संदिप लोणकर यांना ही पक्षाने उमेदवारी नाकारली त्यामुळे ते पक्षावर व वरिष्ठ नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली.ते भाजपास रामराम ठोकून शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे.
प्रभाग क्रमांक १७ मधील भाजप अल्पसंख्याक पुणे शहर अध्यक्ष इम्तियाज मोमीन यांनी भाजप कडून निवडणुक लढण्यासाठी जोरदार तयारी केली होती.अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. एका निष्ठावंत अल्पसंख्याक कार्यकर्त्यांस भाजपाने उमेदवारी दिली नसल्याने ते पक्षावर नाराज होऊन दुस-या शिवसेना उद्धव पक्षाकडून पत्नीस उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिकलीकर समाजाचे भगतसिंग कल्याणी,शक्तीसिंग कल्याणी यास तसेच युवराज कुचेकर यांना उमेदवारी दिली नसल्याने भाजप पक्षावर नाराजी व्यक्त केले. भाजप पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अनेक आयात व पैसै वाल्यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा नागरीकांत चर्चा आहे.






