Ek Deewana Tha Fame Actress Amy Jackson Blessed With Baby Boy
‘एक दीवाना था’ आणि ‘सिंग इज ब्लिंग’ सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन (Amy Jackson)हिने सात महिन्यांपूर्वीच ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. लग्नाला आता ७ महिने झाल्यानंतर लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. ३२ वर्षीय अॅमीने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अॅमीने (Amy Jackson blessed with baby boy) तिचा पती आणि जन्मलेल्या बाळासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री अॅमी जॅक्सन आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकने २५ ऑगस्ट २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. दोन्हीही सेलिब्रिटी कपलने इटलीमध्ये ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं होतं. त्यानंतर डेस्टिनेशन वेडिंगही त्यांनी केलं होतं. अॅमी जॅक्सनचं हे दुसरं लग्न असून तिला पाच वर्षांचा मुलगा आहे, त्याचं नाव अँड्रिया असं आहे. अॅमी जॅक्सन आणि एडवर्ड जॅक पीटर वेस्टविक यांच्या लग्नात अँड्रियाही सहभागी होता. लग्नानंतर दोन महिन्यांनी अॅमीने ती आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. आता तिने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला आहे.
अॅमी जॅक्सनला दुसऱ्यांदा मुलगा झाला आहे. अॅमीने इन्स्टाग्रामवर काही फोटोज् शेअर केले आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत अॅमीने बाळाला पकडलंय, तर तिचा पती एडवर्ड तिला किस करताना दिसतोय. दुसऱ्या फोटोत एडवर्डच्या हातात बाळाचा हात दिसत आहे. तिसऱ्या फोटोत अॅमीने बाळाला जवळ घेत किस करताना दिसत आहे. अॅमीने बाळाचे फोटो शेअर करत त्याचे नावही जाहीर केले आहे. “या जगात तुझे स्वागत आहे, बेबी बॉय. ऑस्कर अलेक्झांडर वेस्टविक”, असं कॅप्शन देत अॅमीने फोटो शेअर केले आहेत. अॅमीच्या या पोस्टवर चाहत्यांसह दोघांच्याही मित्र-मैत्रिणींकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
IPL च्या सुरुवातीलाच के. एल. राहुलच्या घरी ‘गुड न्यूज’; अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म
अभिनेत्री अॅमी जॅक्सन आणि तिचा बॉयफ्रेंड एड वेस्टविक हे कपल दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. जानेवरी २०२४ मध्ये या कपलने स्वित्झर्लंडमध्ये गुपचूप साखरपूडाही आटोपला. लग्नाच्या काही महिन्यानंतर या कपलने इटलीमध्ये गुपचूप लग्न उरकला. अॅमी जॅक्सन पूर्वी जॉर्ज पानायियोटोसोबत रिलेशनमध्ये होती. जॉर्जने अॅमीला जानेवारी २०१९ मध्ये प्रपोज केलं होतं. अभिनेत्रीने होकार दिल्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. दरम्यान अॅमी लग्न न करताच गरोदर राहिली होती. तिने सप्टेंबर २०१९ मध्ये एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. जॉर्जसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अॅमीच्या आयुष्यात एड वेस्टविकची एन्ट्री झाली. अॅमी जॅक्सन आणि एड वेस्टविक हे दोघेही एकमेकांना २०२२ पासून डेट करीत आहेत. हे कपल पेशाने सेलिब्रिटी आहेत.