अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अॅनिमल (Animal) चित्रपट होऊन रिलिज होऊन 14 दिवस झाले आहेत. सोशल मीडियावर सिनेमाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिसाद बघायला मिळत आहे. रणबीरच्या अभिनयासोबत अभिनेता बॅाबी देओलच्या कमबॅकची चांगलीच चर्च होत आहे. चित्रपटाच्या संवादावरुन ट्रोलही करण्यात येत आहे मात्र, तरीही सिनेमाच्या लोकप्रियतेवर काही फरक पडलेला दिसत नाही आहे. चित्रपटाच्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनचा (Animal Box Office Collection) आलेख वाढतानाचं दिसत आहे. गुरुवारी चौदाव्या दिवशी चित्रपटानं बॅाक्स ऑफिस कलेक्शन कमी झालं असून चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई केली आहे.
[read_also content=”फायटरचं पहिलं गाणं रिलीज, दीपिका पदुकोण-हृतिक रोशनची कमाल केमिस्ट्री; तुम्हीही थिरकल्याशिवाय राहणार नाही! https://www.navarashtra.com/movies/fighter-song-sher-khul-gaye-starring-hrithik-roshan-deepika-padukone-release-nrps-489102.html”]
अॅनिमल हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 ला रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 72.50 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 39.9 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी मंगळवारी 37.47 कोटी आणि बुधवारी सहाव्या दिवशी 30.39 कोटींची कमाई केली. सातव्या दिवशी 25.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. तर अकराव्या दिवशी 13.85 कोटींंची कमाई केली आहे. बाराव्या दिवशी 13 कोटींची कमाई केली आहे. तेराव्या दिवशी चित्रपटाने 10 कोटी कमावले तर 14 दिवशी 8.75 कोटी कमाई केली. एकंदरीत या चित्रपटाने [blurb content=””]कमाई केली आहे.
अॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमूख भुमिका आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून ‘A’ रेटिंग मिळाले आहे, हा चित्रपट देखील आतापर्यंत बनवलेल्या सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 3 तास 21 मिनिटांचा आहे.