फोटो सौजन्य - JIO Cinema
बिग बॉस सिझन १८ : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस सिझन १८ ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. होस्ट सलमान खानचा हा शो ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी बिग बॉस चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता बिग बॉस सिझन १८ संदर्भात अनेक वृत्त येत आहेत. बिग बॉस सिझन १८ मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यांदर्भात अनेक टेलिव्हिजल कलाकारांची नावे समोर आली आहे. यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध तारे आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे. दरम्यान, आता बिग बॉस सिझन १८ मधील आणखी एक स्पर्धकांचे नाव समोर आले आहे. ‘अनुपमा’ या लोकप्रिय शोच्या एका अभिनेत्रीचे नावही या शोसाठी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
दिवसेंदिवस बिग बॉस १८ ची उत्सुकता वाढत चालली आहे, सोशल मीडियावर एक बिग बॉस १८ मधील स्पर्धकांची यादी समोर आली आहे. यामध्ये चाहत पांडे, निया शर्मा, शिल्पा शिरोडकर, धीरज धूपर, शोएब इब्राहिम यांसारख्या स्टार्सची नावे या शोसाठी पुढे आली आहेत. श्रद्धा कपूरची मावशी पद्मिनी कोल्हापुरे देखील ‘बिग बॉस १८’ ची स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे. आता या यादीत अनुपमा यांच्या मुलीचेही नाव जोडले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मालिकेमधील अनुपमा हिची मुलगी मुस्कान बामणेला सलमान खानच्या शोसाठी अप्रोच करण्यात आले आहे. तिने ‘अनुपमा’ शोमध्ये पाखीची भूमिका साकारली होती. तीन वर्षे या प्रोजेक्टशी संलग्न राहिल्यानंतर त्याने शो सोडला. त्याचबरोबर आता ती ‘बिग बॉस १८’ मध्ये तिच्या खेळाची जादू दाखवताना दिसणार आहे.
बिग बॉसच्या या नव्या सीझनमध्ये अनेक मोठे चेहरे बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी होणार आहेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यासाठी या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सलमानचे दोन प्रोमो कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.