कोण ठरणार बिग बॉस १८ च्या ट्रॉफीचा विजेता?
सलमान खानने होस्ट केलेल्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसच्या १८ व्या सीझनचा आज शेवट आहे. या शोच्या ग्रँड फिनालेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शेवटच्या भागात, सुरुवातीपासूनच बिग बॉस १८ ट्रॉफीची प्रबळ दावेदार असलेली शिल्पा शिरोडकरला घरातून बाहेर काढण्यात आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. या सीझनच्या अंतिम फेरीत प्रेक्षकांचे मन जिंकून ६ जणांनी स्थान मिळवले आहे, पण आता घरातील सर्व चढ-उतारांवर मात करून या सीझनचा विजेता कोण ठरेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. सध्या करणवीर मेहरा, विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात तगडी टक्कर असल्याचे दिसून येत आहे (फोटो सौजन्य – Instagram)
20 Jan 2025 12:45 AM (IST)
विवियन डिसेनाला हरवून करणवीर मेहरा बनला बिग बॉस १८ चा विजेता ठरला करणवीर मेहरा. बिग बॉसची ही ट्रॉफी पटकावत त्याने अनेकांचे मनही जिंकले आहे. यापुढे करणवीरला भरपूर यश मिळेल असेच चाहत्यांचे म्हणणे आहे
20 Jan 2025 12:28 AM (IST)
रजत बाहेर गेल्यानंतर विवियन आणि करणवीरसाठी वोटिंग लाईन्स ओपन करण्यात आल्या आहेत. चाहत्यांना विनंती करण्यात आली असून आता काही वेळातच विजेत्याचे नाव जाहीर होईल
20 Jan 2025 12:27 AM (IST)
रजत दलाल झाला टॉप २ च्या रेसमधून बाहेर. सर्वांनाच बसला धक्का, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरामध्ये रंगणार विजेतेपदाचा सामना
20 Jan 2025 12:16 AM (IST)
सलमान खानने दिला आठवणींना उजाळा. दिवसात किती शिफ्टमध्ये काम करायचा याबाबत त्याने सांगितले. तर आमिर आणि सलमानने एकत्र काम करण्याची व्यक्त केली इच्छा. तर करणने 'अंदाज अपना अपना'मधील डायलॉग बोलून सर्वांना चकित केले. तर अविनाशने आमिर आणि सलमानची मिमिक्री केली
20 Jan 2025 12:05 AM (IST)
आमिरने केली धमाकेदार एंट्री. सलमान आणि आमिरने 'अंदाज अपना अपना' मधील काही सीन्स रिक्रिएट करत चाहत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तर स्टेजवर दोघांनी धमाल केली आणि प्रेक्षकांनाही या जोडीला पुन्हा पाहण्याची संधी मिळाली
19 Jan 2025 11:48 PM (IST)
जुनैद खान आणि खुशी कपूरने करणवीर, रजत, अविनाश आणि विवियन यांच्यापैकी टॉप ३ कोण ठरणार हा प्रश्न सोडवला. सलमानने दिलेला टास्क पूर्ण करत अविनाशला या गेममधून बाहेर काढले. त्यामुळे आता करणवीर, रजत आणि विवियनपैकी कोण ठरणार विजेता हे पाहणे अगदी औत्सुक्याचे ठरणार आहे. यामुळे अविनाशचे स्वप्न मात्र भंगले आहे.
19 Jan 2025 11:34 PM (IST)
रजत दलालने या सीझनमध्ये अनेक समीकरणं बनवली. यामध्ये ईशाशी बहिणीचे नाते, चाहतशी मैत्री, तर ईडन, कशिश, सारा यांच्याशी मैत्रीचे नाते असतानाही त्या सगळ्या बाहेर गेल्या मात्र रजतला या सगळ्याचा फायदा झाला आणि तो फायनलमध्ये आला
19 Jan 2025 11:13 PM (IST)
अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्राने केली एंट्री. लाफ्टर शेफचे प्रमोशन करण्यासाठी या दोघीही आल्या असून स्टेजवर धमाल केली. पुढच्या शनिवारपासून हा शो सुरू होणार असून सर्वांना एंटरटेन करण्यासाठी हा शो येत आहे
19 Jan 2025 10:59 PM (IST)
लाफ्टर शेफ्सची टीम बिग बॉस १८ च्या अंतिम फेरीत पोहोचली. यावेळी सलमानने एल्विश आणि विकीशी चर्चा केली. अभिषेक, विकी जैन आणि एल्विश यादवने केली धमाल. तर रजतने केली शिल्पा शिरोडकरसाठी केली शायरी
19 Jan 2025 10:49 PM (IST)
टॉप ५ मध्ये समावेश झालेली अरूणाचल प्रदेशची चुम दरांगची आई घरात येऊन चुमला घेऊन गेली. यानंतर रजत, अविनाश, करणवीर आणि विवियन ही चार नावं अजूनही रेसमध्ये असल्याचे दिसून येत आहे. श्रुतिका झाली उदास.
19 Jan 2025 10:39 PM (IST)
बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा आमिर आणि सलमान पहिल्यांदाच स्टेजवर एकत्र आले आहेत. आमिर खान आपला मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या नवा चित्रपट 'लवयापा' चे प्रमोशन करण्यासाठी आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरलीये
19 Jan 2025 10:36 PM (IST)
विवियन, ईशा आणि अविनाश तसंच चुम, करणवीर, शिल्पा, श्रुतिका या ग्रुपचा एक डान्स सादर करण्यात आला आणि या सर्वांची फ्रेंडशिप यातून दिसून आली. तर दुसरीकडे शिल्पा, विवियन आणि करण यांचा आई आणि मुलांचा ड्रामा सादर करणारा हा डान्स खूपच भारी सादर करण्यात आला आहे.
19 Jan 2025 10:21 PM (IST)
वीर पहाडिया स्काय फोर्स या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला असता ईशाला घराबाहेर अखेर घेऊन आलाय. टॉप ५ च्या रेसमधून ईशा बाहेर
19 Jan 2025 10:03 PM (IST)
अरुणाचल प्रदेशात चुम दरंगच्या समर्थनार्थ चाहत्यांनी रॅली काढली. चुम दरंगच्या संघर्षाचे वर्णन करताना त्याच्या आईचे डोळे अश्रूंनी डबडबले. अरुणाचल प्रदेशमधील पहिली मुलगी जिने पासीघाटचे नाव मोठे केले
19 Jan 2025 10:02 PM (IST)
करणवीर मेहराचा गेम केवळ चाहत्यांनाच नाही तर त्याच्या मित्रांनाही अभिमानाचा वाटतोय असे सर्वांनी सांगितले आहे. करणने ट्रॉफी घरी घेऊन यावी असंच सर्वांनी सांगितले आहे
19 Jan 2025 09:52 PM (IST)
बिग बॉस १८ मध्ये टॉप ६ फायनलिस्ट असलेल्या ईशा सिंगला तिच्या बालपणीचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला, ज्यामध्ये तिची आई म्हणत होती की प्रियांका चोप्राचा चित्रपट पाहिल्यानंतर ईशाने विजेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. भोपाळमध्ये, शाळेतील मुलांसह सर्वजण त्याला पाठिंबा देताना दिसले.
19 Jan 2025 09:51 PM (IST)
या सीझनचा टॉप फायनलिस्ट आणि बिग बॉसचा लाडका विवियन डिसेनाला त्याच्या समर्थकांचा आणि कुटुंबाचा व्हिडिओ फिनालेमध्ये दाखवण्यात आला. बाबा, आजी-आजोबा सर्वांनी दिला पाठिंबा, विवियन झाला भावुक
19 Jan 2025 09:44 PM (IST)
रायपूरचा रहिवासी अविनाश मिश्रा बिग बॉस १८ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शोच्या शेवटच्या टप्प्यात, सलमान खानने त्याला रायपूरच्या लोकांकडून एक व्हिडिओ संदेश दिला, जो पाहून अभिनेत्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
19 Jan 2025 09:32 PM (IST)
ताजा खबरवर आलेल्या ताज्या बातमीनुसार तिसऱ्या स्थानावर रजत दलालला समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे आता करणवीर मेहराच्या जिंकण्याच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या असणार. चाहत्यांना यावेळी खराखुरा विजेता मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काय आहे ताजी बातमी
19 Jan 2025 09:15 PM (IST)
रजत-करणवीर-विवियसाठी चाहत्यांचे जोरदार मतदान सुरू झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानावरच आता विजेता घोषित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आधीच लिक झाल्याप्रमाणे विवियन आणि रजत या दोघांमध्ये फायनलच्या ट्रॉफीसाठी लढत असणार असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आधीपासूनच मेकर्सबाबात अनेकांनी खुलेआमपणे आपली मतं व्यक्त केली आहेत.
19 Jan 2025 09:00 PM (IST)
फिनालेच्या दिवशी, वीर पहाडियाने पहिल्या एलिमिनेशनची घोषणा केली. तो त्याच्या 'स्काय फोर्स' या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आला होता. याचा प्रोमोदेखील प्रदर्शित करण्यात आलाय
वीरने केली पहिल्या एलिमिनेशनची घोषणा
19 Jan 2025 08:15 PM (IST)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अविनाश मिश्रा देखील बिग बॉस १८ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की ईशा सिंग आणि चुम दरंग यांनाही अंतिम यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता करणवीर मेहरा, विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत
19 Jan 2025 07:53 PM (IST)
सेटवरून आमिर खान, जुनैद खान आणि खुशी कपूरचा फोटो व्हायरल झाला आहे. आमिरचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर याचा ‘Loveyappa’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय आणि सध्या याचे प्रमोशन जोरात सुरू आहे. यासाठीच संपूर्ण टीम बिग बॉस १८ ग्रँड फिनालेच्या सेटवर पोहचली आहे.
आमिर खानसह मुलगा जुनैद आणि अभिनेत्री खुशी कपूर
Aamir Khan, Junaid Khan, and Khushi Kapoor at the sets of Bigg Boss 18 to promote Loveyapa. pic.twitter.com/2Fc9cpoUvs
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 19, 2025
19 Jan 2025 07:40 PM (IST)
ऑरमॅक्स मीडिया लिस्टनुसार, रजत दलाल हा बिग बॉस १८ चा सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे. त्याच्या विजयाबद्दल अनेक अटकळ आहेत. त्याची लोकप्रियता पाहून असा अंदाज लावला जात आहे की रजत दलाल बिग बॉस १८ चा ट्रॉफी जिंकू शकतो. तर रजतसाठी मतं मागताना त्याचा मित्र एल्विश यादवने रजत दलाल जिंकल्यास 101 Iphone 16 Pro Max देणार असल्याचीदेखील घोषणा केली आहे
19 Jan 2025 07:20 PM (IST)
'बिग बॉस १८' बद्दल आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, ईशा सिंगचा बात चुम दरंग शोमधून बाहेर पडली आहे. करणची बेस्ट फ्रेंड मानली जाणारी आणि यावर्षीच्या बिग बॉसमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी अरूणाचल प्रदेशची चुम दरांग या शर्यतीतून बाहेर झाल्याची बातमी आता समोर येत आहे. मात्र या बातमीची पुष्टी अजूनही देण्यात आलेली नाही
19 Jan 2025 07:11 PM (IST)
एकीकडे चाहते बिग बॉस १८ सीझनच्या ग्रँड फिनालेची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे चाहते सलमान खानच्या आगामी चित्रपट साजिद नाडियाडवालाच्या 'सिकंदर'चीही आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चाहत्यांना बिग बॉस शोमध्ये सिकंदर चित्रपटाचे कनेक्शन पाहता येईल. अंतिम फेरीदरम्यान, सिकंदरची टीम बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेमध्ये येईल असा अंदाज लावला जात आहे
19 Jan 2025 06:59 PM (IST)
रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस १८ च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण तो शूटिंग न करता सेटवरून निघून गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार सेटवर वेळेवर पोहोचला, परंतु सलमान खान उशिरा पोहोचला ज्यामुळे तो अक्षयसोबत शूटिंग करू शकला नाही आणि त्याला शूट सोडून जावं लागलं
19 Jan 2025 06:49 PM (IST)
अनेक इंग्रजी संकेतस्थळ आणि बिग बॉसच्या ताज्या बातम्या देणाऱ्या Taazakhabar नुसार टॉप ६ च्या रेसमधून ईशा सिंग बाहेर पडली असून पहिल्या पाचामध्ये स्थान मिळवू शकली नाही. X वर अशा स्वरूपाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे
X.com वरील व्हायरल मेसेज
🚨 Bigg Boss 18 Grand FINALE Updates
First Eviction on the FINALE
Eisha Singh has been EVICTED at No. 6 position.
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 19, 2025
19 Jan 2025 06:36 PM (IST)
श्रुतिका फिनालेच्या एक आठवडा आधी आऊट झाली. मात्र बाहेर आल्यानंतर तिने आपला संपूर्ण पाठिंबा हा बेस्ट फ्रेंड चुम दरांगला देत असल्याचे सांगितले आहे. चुम ही अत्यंत भोळी आणि चांगली असून तिने हा शो जिंकावा अशी इच्छा श्रुतिकाने व्यक्त केली आहे. तर आपल्या मैत्रिणीला जगातील सर्व आनंद मिळावा असंही तिने सांगितलंय. तर श्रुतिकाने आपले सर्व मित्रमैत्रिणी शिल्पा, चुम आणि करणसह एक बेस्ट परफॉर्मन्सदेखील दिल्याचे प्रोमोमधून दिसून येत आहे
श्रुतिकाने व्यक्त केल्या भावना
19 Jan 2025 06:21 PM (IST)
घरातून बाहेर पडताना शिल्पा शिरोडकरने सांगितले की तिला कोणत्या स्पर्धकाला बिग बॉस १८ चा विजेता म्हणून पहायचे आहे. विवियन आणि करणसोबत खूप चांगले मैत्रीचे संबंध असलेल्या शिल्पा शिरोडकरने तिच्या उत्तराने सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्रीने चुम दरंग हे नाव घेतले. ती म्हणाली की तिला चुमला जिंकताना पहायचे आहे कारण ती अत्यंत शुद्ध मनाची आहे
19 Jan 2025 06:11 PM (IST)
या अंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमा अॅपवर रात्री ९:३० वाजता करण्यात येणार आहे. या भव्य अंतिम फेरीत, अद्भुत डान्स, विविध स्टार्सची उपस्थिती असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीने स्पर्धकांचा प्रवास आणखी खास बनवला जाईल. रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारसह चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स या फिनालेचा भाग असतील. स्पर्धक त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स देतील, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
19 Jan 2025 06:03 PM (IST)
या शोच्या विजेत्याचे नाव रविवार, १९ जानेवारी रोजी जाहीर केले जाईल आणि चाहते त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. शोच्या टॉप ६ फायनलिस्टमध्ये विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, ईशा सिंग, चुम दरंग आणि रजत दलाल यांचा समावेश आहे, त्यानंतर ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेसाठी अंतिम स्पर्धा पाहायला मिळेल. करणवीर मेहराला या ट्रॉफीसाठी सर्वात मोठा दावेदार मानले जात आहे. मात्र नेहमीच शेवटच्या क्षणी निकालात बदल होताना दिसून येतो
19 Jan 2025 05:54 PM (IST)
गेल्या हंगामात बिग बॉसच्या घरातील सदस्य असलेली मन्नारा चोप्रा बरीच चर्चेत आली होती. तिने आपल्या खेळाने लोकांचे खूप मनोरंजन केले. आता मन्नारा चोप्राने या हंगामाच्या विजेत्याचे नावाचे भाकीत केले आहे. अभिनेत्रीच्या मते, या हंगामात करणवीर मेहराने सर्वाधिक मनोरंजन केले आहे, परंतु ट्रॉफीसाठी विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात स्पर्धा रंगू शकते असं तिने म्हटलं आहे
19 Jan 2025 05:47 PM (IST)
शिल्पा शिरोडकरला घरातून बाहेर काढल्यानंतर, आता बिग बॉस १८ च्या विजेत्याच्या शर्यतीत फक्त ६ लोक उरले आहेत. गेल्या भागात, बिग बॉसने बिग बॉस १८ च्या अंतिम स्पर्धकांची नावे जाहीर केली. या यादीत अविनाश मिश्रा, चुम दरंग, ईशा सिंग, करणवीर मेहरा, विवियन डिसेना, रजत दलाल यांचा समावेश आहे. आता टॉप ५ मध्ये कोण स्थान मिळवू शकेल हे पाहणे रंजक ठरेल. सध्या यावर तुफान चर्चा चालू झाल्याचे दिसून येत आहे. आज रात्री विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे.