करणवीर मेहरा ठरला बिग बॉस १८ च्या पर्वाचा विजेता
गेले तीन महिन्यापेक्षा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा बिग बॉस शो चा आज फिनाले झाला. टॉप ६ च्या रेसमध्ये ईशा सिंह, चुम दरांग, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि विवियन डिसेना ही नावं होती. सुरूवातीपासूनच या शो ने मजबूत पकड प्रेक्षकांच्या मनावर घेतली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच यावर्षी बिग बॉस १८ चा विजेता कोण होणार याची चर्चा सगळीकडे होती आणि रात्री ९.३० पासून सुरू झालेल्या या लाईव्ह शो मधून अखेर विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले आहे. प्रेक्षकांचे मन आपल्या खेळाने आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने जिंकलेल्या करणवीर मेहराने हा शो जिंकत ५० लाखाचे बक्षीस आपल्या खिशात घातले आहे (फोटो सौजन्य – Instagram)
विवियनवर केली मात
सुरूवातीपासून करणवीर आणि विवियन या दोघांमध्ये मैत्री आणि शत्रूत्वाचे नाते राहिले होते. तर अनेकदा या दोघांमध्ये भांडणं झालेलीदेखील दिसून आली होती. विवियन डिसेना अजिबात खेळला नाही असं अनेकांचं मत होतं तर काहींनी त्याला अगदी खरा जंटलमन म्हणून गौरवले आहे. तर करणवीर मेहरा पहिले ६ आठवडे कुठेच दिसला नाही असं घरात म्हटलं जात असताना त्याने आपल्या खेळाने सर्वांनाच चकीत केले आणि विवियनवर मात करत ट्रॉफी जिंकली आहे.
18 खेळाडूंवर केला विजय प्राप्त
सुरूवातील बिग बॉसमध्ये १८ स्पर्धकांनी प्रवेश केला होता. तर या खेळात काही खेळाडूच आपली छान पाडू शकले आणि अगदी गल्लीबोळातही करणवीरच्या नावाचा डंका होता. यावेळी अगदी मीडियानेदेखील करणवीर मेहराला आपले मत दिल्याचे दिसून आले होते. खरा खेळाडू कधी जिंकणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे चाहते आणि अनेकांची खडाजंगी सोशल मीडियावर दिसून येत होती. अनेकांनी करणवीरने मीडियाला खिशात घातले आहे असंही म्हटलं होतं. मात्र करणवीरने आपल्या खेळाने हे सर्व जिंकून घेतलं आहे असंच सांगण्यात येत आहे.
करणवीरचे ट्रॉफीवर कोरले नाव
बिग बॉस १८ ची ट्रॉफी नक्की कोणाची होणार यावर गेले काही दिवस तुफान चर्चा रंगली होती आणि अखेर सर्वांची तोंडं बंद करत करणवीर मेहराने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सलमान खानने करणवीरच्या हाती ही ट्रॉफी सुपूर्द केली आणि त्याच्या नावाचा धनादेशही त्याला देण्यात आला आहे. आता करणवीर जे नेहमी म्हणायचा ‘देर से ही सही ऊँची उडान भरूँगा’ हे सिद्ध झालाय.
Bigg Boss 18 ची जर्नी पाहून करणवीर मेहरा झाला भावुक ! म्हणाला ” इतना भरोसा तो था मुझे…”
करणवीर मेहराचे ट्रॉफीवर नाव