फोटो सौजन्य - JioHotstar Reality
Bigg Boss 19 First elimination : बिग बॉस 19 ला सुरू होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत आणि आता बिग बॉसच्या घरातला पहिला स्पर्धक हा घराबाहेर झाल्याचे सांगितले जात आहे. टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त शो बिग बॉस 19 ला सुरुवात झाली आहे. सलमान खानच्या या शोची जगभरामध्ये पसंती आहे. या नव्या सीजन मध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यातून स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
आता या 19 व्या सीजनचे पहिले नॉमिनेशन पार पडले आणि या पहिल्या नॉमिनेशनचे दिवशी पहिला स्पर्धकाला देखील घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसने नॉमिनेशनचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे यामध्ये स्पर्धक एकमेकांशी वाद घालताना पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरातला सदस्यांनी सर्वाधिक नाव हे फरहान भट हिचे घेतले होते त्यानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले आणि आत्ता बिग बॉस ने तिला सिक्रेट रूममध्ये दाखल केले आहे.
Bigg Boss 19 : Farhana Bhatt became the first contestant to be evicted from the house after housemates voted against her, calling her the “least interactive” and accusing her of skipping chores. But Farhana didn’t go down without a fight – she fiercely defended her right to live… pic.twitter.com/ceJZJZ9OXK
— BiggBoss24x7 (@BB24x7_) August 25, 2025
सीक्रेट रूम हा मागील काही सीझनमध्ये काढून टाकण्यात आला होता पण आता बिग बॉस ने जुन्या सीजनमध्ये असलेला सिक्रेट रूम पुन्हा एकदा या सीझनमध्ये तयार केला आहे आणि त्याने स्पर्धकांना बिग बॉसच्या घरामध्ये झालेले ट्विस्ट पाहायला मिळतात त्याच्यानंतर ते आता पुन्हा बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर कशी प्रतिक्रिया असेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धकांनी आपापल्या कामांची विभागणी केली आहे. २५ ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या पहिल्या पूर्ण एपिसोडमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट येत असल्याने उत्साह द्विगुणीत झाला आहे.
बिग बॉसने घरातील सदस्यांना पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाला मतदान करून बाहेर काढण्याचे आव्हान दिले आहे, ज्यामुळे सुरुवातीला भांडणाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या एलिमिनेशनमधून कोण सुटते आणि प्रीमियर आठवड्यात कोण बाहेर पडते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे, अमाल मलिकने झीशान कादरीशी झालेल्या संभाषणात त्याच्या आधीच्या गूढ पोस्टबद्दल सांगितले. तो म्हणाला की त्यावेळी माझे माझ्या आईशी भांडण झाले होते आणि मला माझी ओळख गमावण्याची भीती वाटत होती. कारण मी गाणी लिहित होतो आणि मला श्रेयही मिळत नव्हते.