बिग बॅास ओटीटी 2 विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish yadav) सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिल्ली एनसीआर परिसरातील अनेक ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन, पार्टीत विषारी सापाचं विषं, परदेशी मुली पुरवल्याचा आरोप करत एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून काही ठिकाणावरुन विषारी सापही जप्त केले. हे प्रकरण वाढत जात असताना एल्विश यादवने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे असल्याची असल्याचं त्यानं म्हण्टलं आहे.
[read_also content=”बिग बॅास विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल, विषारी सापांची तस्करी आणि रेव्हपार्टीत ड्रग्स पुरवल्याचा आरोप! https://www.navarashtra.com/movies/case-registered-against-ott-big-boss-winner-elvish-yadav-for-smuggling-poisonous-snakes-and-organizing-rave-party-illegally-nrps-477190.html”]
या प्रकरणी एल्विश यादव एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याच्यावरील सर्व आरोप खोटं असल्याचं म्हण्टलं आहे. एल्विश म्हणाला की, माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पार्टीत ड्रग्स पुरवल्याच्या, विषारी सापांच विष पुरवल्याच्या बातम्या ऐकण्यात येत आहे. या बातम्यांमध्ये एक टक्काही यात काही सत्यता नाही. माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे आहेत. पण चौकशीसाठी मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन”. असं तो म्हणाला.
???? pic.twitter.com/13WLDKJzYb — Elvish Yadav (@ElvishYadav) November 3, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, पीएफए या संस्थेने तक्रार दाखल केली होती की, एल्विश यादव नावाचा यूट्यूबर त्याच्या टोळीसह सापाचे विष आणि जिवंत साप पुरवतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून काही जणांना अटक केली. घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बदरपूर येथील राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे. झडती घेतली असता राहुलच्या कमरेला लटकलेल्या पिशवीत सापाच्या विषाने भरलेली प्लास्टिकची बाटली सापडली. प्रत्येकाच्या जवळ नऊ जिवंत साप आढळले. ज्यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, एक घोड्याच्या शेपटीचा साप आणि दोन दोन डोकी असलेल्या सापांचा समावेश आहे.






