चंद्रिका दीक्षितवर अनिल कपूरचा राग
बिग बॉस ओटीटी 3 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये अनिल कपूरने आधी स्पर्धकांसोबत खूप मस्ती केली आणि नंतर सर्वांनाच फैलावर घेतल्याचे शनिवारी दिसून आले. अनिल कपूरने बिग बॉसच्या घरातील सदस्यांशी गेल्या आठवड्यातील मुद्द्यांवर चर्चा केली आणि नंतर वडा पाव गर्लचा खेळ किती खालच्या दर्जाचा आहे हे उघड केले.
यावेळी अनिल कपूरने वडा पाव गर्लला म्हणजेच चंद्रिका दीक्षितला ढोंगीपणा आणि सतत विशाल पांडे आणि अरमान मलिकमध्ये घडलेल्या गोष्टी उकरून काढण्याबाबत आणि त्याचा स्वतःसाठी चुकीचा उपयोग करून घेण्यासाठी अनेक गोष्टी सुनावल्या, सध्या हा व्हिडिओ खूपच व्हायरल होताना दिसून येत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
अनिल कपूर रागात काय म्हणाला
बिग बॉस OTT 3 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अनिल कपूरने चंद्रिका दीक्षितच्या खेळाचा पर्दाफाश केला. अनिल कपूरने चंद्रिकाला तिच्या खेळाबद्ल खडसावले. विकेंड का वारमध्ये अनिलने चंद्रिकाची कानउघडणी करताना म्हटले की, चंद्रिका, या घरात तुझी काहीच जागा नाहीये. तुला लोकांचे कार्ड खेळायला आवडते. अनिल कपूरने अरमान मलिक आणि विशाल पांडेच्या थप्पड प्रकरणाला वेगळा अँगल दिल्याबद्दलदेखील चंद्रिकाला फटकारले.
चंद्रिकाच्या ढोंगीपणाबद्दल केला खुलासा
अनिल कपूरने यावेळी चंद्रिकाला चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. त्याने चंद्रिकाला म्हटले की, या घरात तुझे अस्तित्व काय आहे. जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीबद्दल टिप्पणी केली तर ते चुकीचे आहे आणि पण एक मुलगी हे करू शकते का?. याला ‘दांभिकता’ असे म्हणतात हे तुला माहीत आहे का? अनिल कपूरने फटकारल्यानंतर चंद्रिका स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरदेखील अनिल कपूरने सांगितले की, तिला तिच्या मित्रांना जाहीरपणे लाजवायचे आहे. तुम्ही हा विषय खुल्या व्यासपीठावर तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि तुमच्या मित्रांना अपमानित करण्यासाठी मांडत आहात, जे अत्यंत चुकीच आहे.
घरातून कोण बाहेर होणार?
विशाल पांडे, लवकेश कटारिया, शिवानी कुमारी, अरमान मलिक आणि चंद्रिका दीक्षित या आठवड्यात बिग बॉस ओटीटी 3 मध्ये बाहेर येण्यासाठी नामांकित आहेत. रविवारच्या रात्रीच्या भागामध्ये यामधून नक्की कोण बाहेर आले ते कळेल. मात्र यावेळी खूपच जास्त स्पर्धा असून यातून कोण वाचेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.