(फोटो सौजन्य - अकाउंट)
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने स्वातंत्र्यलढ्यात प्राण गमावलेल्या शहीदांचे स्मरण केले. या निमित्ताने अक्षयने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने लिहिले, “ना विसरले गेले, ना माफ केले गेले.” असं लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला आता प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच लवकरच आता अभिनेत्याचा ‘केसरी २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित आहे.
हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले
अक्षयची ही पोस्ट जालियनवाला बागेच्या दुःखद घटनेबद्दल आहे, जेव्हा बैसाखीच्या दिवशी शांततापूर्ण मेळाव्यात सहभागी झालेले लोक ब्रिटीश सैन्याच्या क्रूरतेचे बळी ठरले. यामध्ये हजारो निष्पाप लोक मारले गेले आणि जखमी झाले. या पोस्टद्वारे अक्षयने केवळ शहीदांचे स्मरण केले नाही तर आजच्या पिढीला इतिहासाच्या या काळ्या अध्यायाशी जोडण्याचा प्रयत्न केला.
अक्षय देशाप्रती असलेली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतो
अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामातून देशभक्ती आणि सामाजिक मुद्दे पुढे आणतो. त्याचे चित्रपट असोत किंवा सोशल मीडियावरील संदेश असोत, तो देशाप्रती असलेली त्याची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पडताना दिसत असतो. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वर्धापनदिनानिमित्त त्याची ही पोस्ट देखील त्याच भावनेचा एक भाग आहे.
Box Office Report: ‘Jaat’ने बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ, ‘Good Bad Ugly’च्या कमाईत मोठी वाढ!
चित्रपटात दिसणार ‘हे’ कलाकार
‘केसरी चॅप्टर २’ मध्ये अक्षय कुमारसोबत आर माधवन आणि अनन्या पांडे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात माधवन नेव्हिल मॅककिन्लीची भूमिका साकारत आहे, तर अनन्या पांडे दिलरीत गिलची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंह त्यागी यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.