विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महाराष्ट्रात या चित्रपटातल्या काही सीन्समुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांच्या एका गटाने चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी मागणीही केली होती. पण नंतर दिग्दर्शकांनी प्रेक्षकांची माफी मागत सीन्समध्ये बदल करण्याचे आश्वासन देत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला.
सध्या सर्वत्र उत्सुकता आहे ती अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाची. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खरंतर, हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज करण्यात आला होता. आता लवकरच या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.
हल्लेखोराची सैफच्या मोलकरणीकडे १ कोटी खंडणीची मागणी; FIRमध्ये मोठी अपडेट समोर
विकी कौशलच्या ह्या बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. यापूर्वी हा चित्रपट डिसेंबर महिन्यात रिलीज होणार होता. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ बरोबर विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपटही क्लॅश होणार होता. मात्र, यानंतर ‘छावा’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आली. टीझर आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता होती ती ट्रेलरची… अखेर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभाचं औचित्य साधत चित्रपटाच्या टीमने आमि मॅडॉक फिल्म्सकडून ‘छावा’ची नवीन रिलीज डेट आणि ट्रेलरची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मॅडॉक फिल्म्सने पोस्ट शेअर करत लिहिलेय की, “छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी १६८१ रोजी पार पडला होता. या दिनाचं औचित्य साधत आज बरोबर ३४४ वर्षांनंतर आम्ही महाराजांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी सज्ज झालो आहोत.” छावा चित्रपटाचा ट्रेलर येत्या २२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं मॅडॉक फिल्म्सने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. याशिवाय मॅडॉक फिल्म्सने चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे.
कंगना रणौतच्या Emergency च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी CM देवेंद्र फडणवीसांची हजेरी
बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट पूर्वी ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली होती. अखेर येत्या १४ फेब्रुवारीला विकी कौशलचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेसाठी विकी कौशलने दिवसरात्र मेहनत घेतली होती. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणं ही अभिनेत्यासाठी मोठी गोष्ट होती. चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल. तर, चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.