(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो, पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाढ पाहत होते. तसेच चाहत्यांची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आणि तो हिट झाला आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे आणि यामधील प्रेक्षकांना काय आवडले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय आहे?
आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, हा ट्रेलर खूपच भन्नाट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे दिसून येते की हा चित्रपट दिव्यांग लोकांवरील एका रोमांचक क्रीडा नाटकावर आधारित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आमिर खान एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे आणि तो अपंग लोकांच्या संघाचा बास्केटबॉल प्रशिक्षक आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या ३ मिनिटे १९ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये, तुम्हाला आमिर खानसोबत जेनेलिया डिसूझाची झलक देखील पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे तसेच या चित्रपटामध्ये धमाल, मस्ती पाहायला मिळणार आहे.
‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ दिग्दर्शक Robert Benton यांचे निधन; ऑस्कर पुरस्काराने देखील सन्मानित!
‘सितारे जमीन’ चा ट्रेलर कसा आहे?
आमीर खानच्या चित्रपटाचा हा ट्रेलर खूपच मजेदार आहे आणि लोकांना तो खूप आवडतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता, युजर्स देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने यावर कमेंट करत लिहिले, ‘वर्षातील सर्वोत्तम चित्रपट’. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘आमिर खान पुनरागमन करत आहे, आशा आहे की काहीतरी चांगले होईल’. तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, ‘बॉक्स ऑफिसचा राजा परत आला आहे.’ असे लिहून अनेक चाहत्यांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित
याशिवाय, एका वापरकर्त्याने म्हटले की ट्रेलर खूप मजेदार आहे. दुसऱ्याने लिहिले, काय ट्रेलर आहे, चित्रपट हिट होणार आहे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की आमिर खान परत आला आहे. यावरूनच स्पष्ट होते की चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आमिर खानच्या या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत हे उल्लेखनीय आहे. जर आपण चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल बोललो तर हा चित्रपट २० जून रोजी संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.