(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाला अखेर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून हिरवा सिग्नल मिळाला आहे. विशेष म्हणजे सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट कोणत्याही कटशिवाय थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे, ज्यामुळे आमिरच्या चाहत्यांमध्ये उत्साह द्विगुणीत झाला आहे. तसेच हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
२००७ च्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा एक नवा सिक्वेल
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात शिक्षण व्यवस्था आणि मुलांच्या मानसिकतेवर प्रभावी चर्चा झाली होती. त्या चित्रपटाचे जगभरात ९८ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले होते आणि त्याला ११ फिल्मफेअर नामांकने आणि ३ राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे. आता, सुमारे १८ वर्षांनंतर, आमिर त्या चित्रपटासारखा आणखी एक भावनिक प्रवास घेऊन येत आहे. जरी हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ चा थेट सिक्वेल नसला तरी, तो एक आध्यात्मिक सिक्वेल म्हणून पाहिला जात आहे. म्हणजेच, चित्रपटाचा संदेश आणि मूलभूत भावना सारखीच आहे, परंतु कथा पूर्णपणे नवीन असणार आहे.
मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हार्ट ॲटक; डॉक्टरांना म्हणाला, “मी प्रयोग करून येतो, नंतर…”
आमिरच्या चित्रपटामध्ये दिसणार १० नवीन कलाकार
या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे यात १० नवीन कलाकारांना लाँच केले जात आहे. तसेच, आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख देखील दिसणार आहे. दोघांच्या जोडीबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे, कारण पहिल्यांदाच ते दोघेही एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे, जे ‘शुभ मंगल सावधान’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आमिर या चित्रपटाचा सह-निर्माता देखील आहे आणि त्याच्या सर्जनशील कार्यामुळे हा प्रकल्प खास बनला आहे.
मनारा चोप्राच्या वडिलांच्या निधनावर प्रियांकाची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘ते नेहमीच आमच्या हृदयात…’
कधी प्रदर्शित होणार चित्रपट ?
आमिर खानचा हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कोणताही कट न करता पास झालेल्या या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीत सकारात्मक वातावरण आहे. अशी अपेक्षा आहे की आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यात यशस्वी होईल. आणि प्रेक्षकांचं मन जिंकेल. तसेच हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणे मनोरंजनक ठरणार आहे.