(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“महाराज” आणि “लव्हयापा” सारख्या चित्रपटांनंतर जुनैद खान आता आणखी एक बॉलीवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. ज्याचे नाव आहे “एक दिन”. या चित्रपटाचे नुकतेच पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टरसह, निर्मात्यांनी आज “एक दिन” ची रिलीज तारीख शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
जुनैदसोबत स्क्रीन शेअर करत आहे साई पल्लवी, जी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये मोठी सुरुवात करत आहे. तेलुगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे. साई पल्लवी साऊथमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते आणि देशभरातील प्रेक्षकांमध्ये ती खूपच प्रिय आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘एक दिन’मध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत आहेत.
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी, तन्वी कोलते ढसाढसा रडली, नक्की काय घडलं?
“एक दिन” चित्रपटाचे पोस्टर रिलीज
आमिर खान प्रॉडक्शनने आज, १५ जानेवारी २०२६ रोजी “एक दिन” चे पहिले पोस्टर रिलीज केले. यात जुनैद खान आणि साई पल्लवी बर्फात एका रोमँटिक वातावरणात दिसत आहेत. दोघे कडाक्याच्या थंडीत आईस्क्रीमचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. पोस्टरसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जीवनाच्या गोंधळात, प्रेम तुम्हाला एक दिवस शोधेल.” असे लिहून हे पोस्ट शेअर करण्यात आले आहे. आता दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांची आतुरता वाढली आहे.
“एक दिन” चा टीझर आणि चित्रपट कधी रिलीज डेट?
चित्रपट निर्मात्यांनी “एक दिन” च्या प्रदर्शनाची तारीख आणि दोघांची पहिली झलक दाखवली आहे. “एक दिन” हा नवाकोरा चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला टीझर उद्या, १६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच टीझरमध्ये काय काय पाहायला मिळेल आणि या चित्रपटाची कथा नक्की काय असेल हे चाहत्यांना समजणार आहे.
Mayasabha: IMDb वर रिलीजआधीच 8.3 रेटिंग! “तुंबाड” दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटाची पुरेशी आहे एक झलक
जाणून घ्या “एक दिन” चित्रपटाबद्दल
“एक दिन” चे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले आहे. “एक दिन” ची कथा स्नेहा देसाई आणि स्पंदन मिश्रा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती मन्सूर खान, आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. संगीत राम संपत यांचे आहे. गीते इर्शाद कामिल यांचे आहेत. जुनैदचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी जुनैद “महाराज” आणि “लव्हयापा” मध्ये दिसला आहे. साई पल्लवी ही एक दक्षिण अभिनेत्री आहे. ती रणबीर कपूरसोबत “रामायण” मध्ये दिसणार आहे.






