(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘जाट’ १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन जेमतेम एक आठवडा चांगला चालला आणि निर्मात्यांनी आत या चित्रपटाच्या सिक्वेल ‘जाट २’ ची घोषणा आधीच केली आहे. चित्रपटाची स्टारकास्ट काय असेल हे देखील निर्मात्यांनी उघड केले आहे. ‘जाट’ हा चित्रपट सिनेमागृहात सुरु असता या चित्रपटाच्या सिक्वेलची बातमी ऐकून चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे.
‘JAAT 2’ ची केली घोषणा
Mythri Movie Makers ने X वर एक पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये Jatt च्या सिक्वेलची माहिती देण्यात आली आहे, ज्यावर Jatt 2 ठळक अक्षरात लिहिले आहे. Mythri Movie Makers ने X वर या एका फोटोसह लिहिले आहे की, “बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर JAAT विश्रांती घेत नाहीये. तो एका नवीन मोहिमेवर आहे. यावेळी, #JAAT2 मध्ये ॲक्शन सुपरस्टार सनी देओल अभिनीत MASS FEAST मोठा, धाडसी आणि वाइल्ड असेल.’ असं त्यांनी लिहिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती Mythri Official आणि People Media FCY द्वारे केली जाणार आहे.
कोण आहे Varun Grover? जो कुणाल कामराच्या वादात अचानक चर्चेत !
#JAAT is not resting after the blockbuster at the box office 💥
He is on to a new mission. This time, the MASS FEAST will be bigger, bolder, and wilder 💪#JAAT2 ❤🔥
Starring Action Superstar @iamsunnydeol
Directed by @megopichand
Produced by @MythriOfficial &… pic.twitter.com/Cp5RMrgXuR— Mythri Movie Makers (@MythriOfficial) April 17, 2025
‘जाट २’ ची स्टारकास्ट
Mythri Movie Makers ने x अकाउंटवरील पोस्टमध्ये, सनी देओलचे नाव विशेषतः ठळक अक्षरात लिहिलेले दिसते आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की ‘जाट’ च्या सिक्वेलमध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तथापि, या पोस्टसोबत चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. या चित्रपटात रणदीप हुड्डा असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, सनी देओलचे चाहते ‘जाट’ चित्रपटाच्या सिक्वेलच्या घोषणेमुळे खूप आनंदी आहेत आणि या चित्रपटाबद्दल अधिक माहितीची अपेक्षा करत आहेत.
‘पिक्चर अभी बाकी है…’; ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर Ranveer Allahbadia असं का म्हणाला?
‘जाट’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल?
‘जाट’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि दुसरीकडे, त्याच्या ओटीटी रिलीजची माहिती देखील बाहेर येऊ लागली आहे. थिएटरनंतर ‘जाट’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो? आता तेही उघड झाले आहे. ‘जाट’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार असल्याचे सांगितले जात आहे.