(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेता अल्लू अर्जुन काही वेळातच आज हैदराबाद पोलिसांसमोर हजर होणार आहे. पुष्पा २ च्या स्क्रिनिंगदरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी कमी होत नसताना रविवारी सायंकाळी त्याच्या घरासमोर घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशी केली जाणार
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मंगळवारी पोलिसांकडून अभिनेत्याची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात यावे लागणार आहे. अभिनेते येण्यापूर्वी पोलिस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहेत.
#WATCH | Hyderabad | Actor Allu Arjun to appear before Chikkadpally police station today, in connection with the Sandhya Theatre incident pic.twitter.com/fvy3tEdos7
— ANI (@ANI) December 24, 2024
सासरे कंचराला चंद्रशेखर रेड्डी अभिनेत्याच्या घरी पोहोचले.
अभिनेता अल्लू अर्जुनचे सासरे कंचर्ला चंद्रशेखर रेड्डी मंगळवारी अल्लू अर्जुनच्या जुबली हिल्स येथील निवासस्थानी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला नोटीस बजावून संध्या थिएटरच्या घटनेप्रकरणी हजर राहण्यास सांगितले आहे. आणि आता अभिनेता लवकरच हैदराबाद पोलिस ठाण्यात हजर राहणार आहे.
#WATCH | Hyderabad, Telangana: Security deployed outside actor Allu Arjun’s residence in Jubilee Hills.
According to Sources, Hyderabad police have issued a notice to actor Allu Arjun, asking him to appear before them in connection with the Sandhya theatre incident. pic.twitter.com/M97VG6gvDk
— ANI (@ANI) December 24, 2024
अभिनेत्याच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
अल्लू अर्जुनच्या ज्युबली हिल्स निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी आणि एका महिलेचा मृत्यू प्रकरणी एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर अभिनेता अल्लू सध्या जामिनावर बाहेर आला आहे. आज त्याची चौकशी होणार आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये ‘पुष्पा 2’ च्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.