(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हिंदी चित्रपटसृष्टीत ८० आणि ९० च्या दशकात दमदार उपस्थिती दर्शवणारे महेश आनंद हे नाव एकेकाळी अॅक्शन आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या उंच बांध्यामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याकडे एका नायकाची शारीरिक क्षमता होती, परंतु त्यांना क्वचितच नायकाच्या भूमिकांमध्ये संधी मिळाली. बहुतांश चित्रपटांमध्ये ते निर्दयी खलनायक किंवा पार्श्वभूमी नर्तक म्हणून झळकले.महेश आनंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयात जोश, स्टाईल आणि प्रभाव होता, परंतु वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत क्लेशकारक ठरले. त्यांनी पाच विवाह केले होते आणि अनेक प्रेमसंबंधांमध्येही अडकले, परंतु त्यांना खरे प्रेम किंवा स्थैर्य कधीच लाभले नाही.
शेवटच्या काळात ते पूर्णपणे एकटे झाले होते. २०१९ मध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा संपूर्ण उद्योग हादरला — कारण त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात तीन दिवस पडून कुजत होता. जेव्हा शेजाऱ्यांना दुर्गंधी जाणवली तेव्हा पोलिसांना कळविण्यात आले आणि त्यांनी घरात प्रवेश केला.महेश आनंद यांनी १९८२ मध्ये “सनम तेरी कसम” या चित्रपटातून नर्तक म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. पुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे त्यांना मोठ्या नायकांसोबत महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या. त्यांनी अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन, सलमान खान, विनोद खन्ना आणि मोहनलाल यांसारख्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर केली.
दक्षिण चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली छाप सोडली “वीरा” मध्ये रजनीकांतसोबत, “पेरिया मारुधू” मध्ये विजयकांतसोबत आणि “शिवशक्ती” मध्ये सत्यराजसोबत काम करत त्यांनी स्वतःला एक क्रूर, परंतु आकर्षक खलनायक म्हणून सिद्ध केले. प्रेक्षकांना त्यांचा द्वेष करायला आवडायचा आणि हाच त्यांच्या अभिनयाचा प्रभाव होता.महेश आनंद यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या पडद्यावरील भूमिकांइतकेच नाट्यमय आणि दुःखद होते. पाच विवाह आणि १२ प्रेमसंबंध असूनही त्यांना कधीच स्थैर्य वा खरी साथ मिळाली नाही. आयुष्याच्या शेवटी ते पूर्णपणे एकटे पडले.
८० कोटींचा हिरो, अपयशी खलनायक; बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला चित्रपट आता OTTवर ट्रेंडिंग
त्यांचे पहिले लग्न बरखा रॉय यांच्याशी झाले होते, परंतु हे नाते काही महिनेच टिकले. त्यानंतर त्यांनी माजी मिस इंडिया मारिका डिसूझा यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला, पण मुलाच्या जन्मानंतर हे लग्नही तुटले.
१९९२ मध्ये त्यांनी मधु मल्होत्रा यांच्याशी तिसरे लग्न केले, पण त्यांच्यासोबत ही घटस्फोट झाला. यानंतर त्यांच्या आयुष्यात उषा बच्चन आली. काही काळाच्या डेटिंगनंतर त्यांनी एका खाजगी समारंभात लग्न केले, परंतु हे नाते फक्त दोन वर्षेच टिकले.
‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर
शेवटी, महेश आनंद यांनी लाना नावाच्या रशियन महिलेशी विवाह केला, पण हे नातेही फार काळ टिकू शकले नाही. प्रत्येक वेळी त्यांनी प्रेमावर विश्वास ठेवला, पण प्रत्येक वेळी त्यांच्या आयुष्यात हृदयभंग आणि एकटेपणाचे सावट आले.






