(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘ऊत’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ चित्रपटात संघर्ष कथेसोबतच एक प्रेमकथाही पहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास निर्माता अभिनेता राज मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केला.
गौतमी पाटील ‘नऊवारी’ गाण्यात प्रथमच दिसली रणरागिणीच्या भूमिकेत, गाणे तुफान व्हायरल
एका हळव्या प्रेमकथेची किनार दाखवताना चित्रपटाचा नायक शरणम याचा भुतकाळ, त्याचा संघर्षाचा काळ, त्यांनी पचवलेले दु:ख आणि त्यानंतरही उभे राहण्याची जिद्द प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कथेचा नायक शरणम… कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधू पाहतोय. स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि स्वप्न पूर्ण करायला पण पैसे लागत नाहीत लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द. शरणमने हाती घेतलेलं असाध्य ध्येय पूर्ण होतं का? असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का? या आणि अशा अनेक उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी २१ नोव्हेंबरला येणारा ‘ऊत’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
राज मिसाळ, आर्या सावे या नव्या जोडीसोबत सुपर्णा श्याम राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी, श्रेया देशमुख, धनश्री साटम, रूपाली पाथरे आदि कलाकारांच्या सुद्धा चित्रपटात भूमिका आहेत. या सगळ्यांचे पात्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
प्रसिद्ध जपानी अभिनेता Tatsuya Nakadai यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘ऊत’ चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी करण तांदळे तर संकलनाची जबाबदारी सुनिल जाधव यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वैशाली काळे तर रंगभूषा अमर राठोड यांची आहे. कलादिग्दर्शन निलेश गरुड तर नृत्यदिग्दर्शन जीत सिंह यांचे यांचे आहे. वैभव देशमुख, वैभव जोशी, डॉ.विनायक पवार, सुबोध पवार, दिपक वाघ यांनी लिहिलेल्या गीतांना अजय गोगावले, हरिहरन, आदर्श शिंदे, जयदीप वैद्य, योगेश गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. विजय गवंडे, श्रेयस आंगणे, आशोतोष कुलकर्णी, अरविंद सांगोळे, शारंग जैसवाल यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.






