फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस १८ ने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. असो, आता शोला फक्त दोन आठवडे उरले आहेत. १९ जानेवारी २०२५ रोजी ट्रॉफी कोणाच्या हातात जाणार हे समजणार आहे. कशिश कपूरच्या बाहेर पडल्यानंतर बिग बॉस १८ मध्ये फक्त ९ स्पर्धक उरले आहेत. याआधी निर्मात्यांनी शोमध्ये मोठा खेळ केला आहे. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी वेळेशी खेळ केला आहे. खुद्द होस्ट सलमान खानने काल रात्री वीकेंड का वारमध्ये ही माहिती दिली. वास्तविक, बिग बॉस १८ च्या चाहत्यांना आता त्यांचा आवडता शो पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल कारण शोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
वेळेच्याच संदर्भात आता बिग बॉसच्या आगामी भागामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया होणार आहे. नॉमिनेशन टास्कचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी स्पर्धकांचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पहिला ग्रुप चाहत पांडे, रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुन यांचा पहिला गट आहे, तर दुसरा गट शिल्पा शिरोडकर, करणवीर मेहरा आणि चुम दारंग हा गट आहे आणि तिसरा गट विवियन डिसेना, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांचा तयार करण्यात आला आहे. यावेळी गार्डन परिसरामध्ये एक रूम तयार करण्यात आला आहे. यामध्ये एक-एक गटाला जाऊन इथे टाइम मोजायचा आहे. यावेळी मागील दोन सदस्य जेव्हा टाइम मोजू शकत नाही तो मधल्या खुर्चीवर बसलेला असेल तोच फक्त टाइम मोजू शकतो.
Bigg Boss 18 : चाहत पांडेच्या आईचे बिग बॉसला चॅलेंज, म्हणाली- माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड मिळाला तर…
यावेळी काही घरातल्या सदस्यांनी टास्कच्या वेळी चीटिंग केल्याचे बिग बॉसच्या निदर्शनात आले आहे. यावेळी त्यांनी स्पर्धकांना डायरेक्ट नॉमिनेट केले आहे. यावेळी करणवीर मेहरा विवियन, अविनाश आणि इशाच्या गटाला भटकण्याचा प्रयत्न करत होता. तर चाहत पांडे, रजत दलालच्या गटाला अविनाश मिश्रा भटकावण्याचा प्रयत्न करताना दिसला.
Nomination Task Promopic.twitter.com/cLwSbotuCv
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 6, 2025
काल रात्री बिग बॉस १८ वीकेंड का वार मध्ये, सलमान खानने स्वतः शोच्या वेळेबद्दल एक अपडेट दिली. यानंतर चाहते खूपच निराश झाले आहेत. साहजिकच, चाहत्यांना हिवाळ्यात इतक्या उशिरापर्यंत जागे राहणे आधीच अवघड होते. आता हा शो अर्ध्या तासाच्या विलंबाने प्रसारित होणार असून, त्यानंतर चाहत्यांची निराशा झाली आहे.
विशेष म्हणजे बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेला फक्त दोन आठवडे उरले आहेत. कशिश कपूरचा या शोसोबतचा प्रवास काल रात्री संपला. ताज्या नॉमिनेशनमध्ये, रजत दलाल, श्रुतिका आणि चाहत पांडे यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले आहे. असे मानले जाते की या आठवड्यात घरामधून डबल इव्हिक्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे