फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क झाला. याशिवाय, शेवटच्या एपिसोडमधील कशिश कपूर आणि अविनाश मिश्रा यांच्यातील भांडण हे शोचे खास आकर्षण होते. दोघांमध्ये वाद होतो आणि नंतर प्रकरण इतके वाढले की कशिश अविनाशला वूमनाइजर म्हणाली. तिने अविनाशवर आरोप केला आहे की अभिनेत्याने तिच्याबद्दल चुकीची विधाने केली आहेत.
खरं तर, असं होतं की, रजत दलाल करण वीर मेहरा आणि शिल्पा शिरोडकरला सांगतात की अविनाश कशिश आणि ईशा सिंगसोबत प्रेमाचा ट्रँगल करण्याचा प्रयत्न करत आहे. रजत म्हणाला की अविनाशने कशिशला सांगितले की प्रेक्षकांना शोमध्ये एक वेगळा अँगल पाहायला मिळेल, याचा अर्थ तो अप्रत्यक्षपणे कशिशला त्याच्यासोबत बनावट प्रेम ट्रँगल तयार करण्याचा इशारा देत होता. अविनाश हे सर्व लक्ष वेधण्यासाठी करत असल्याचा आरोप तिने कालच्या भागामध्ये केला.
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा रजत दलालमध्ये धक्काबुक्की! राशनच्या टास्कवरून भिडले एकमेकांशी
यानंतर, करण कशिशला विचारतो की अविनाशने तिच्याशी प्रेम ट्रँगलबद्दल बोलणं झालं होत का, ज्याला कशिश स्पष्टपणे नकार देते. तथापि, ती सांगते की अविनाश तिच्यासोबत फ्लर्ट करतो आणि म्हणतो की हा शोसाठी देखील एक चांगला फ्लेवर आहे. त्यानंतर करण म्हणतो की याचा अर्थ अविनाश जो ईशाबद्दलच्या त्याच्या भावना सांगतो त्या भावना खोट्या आहेत का? कशिशही यावर सहमत होते. टास्क संपल्यानंतर ईशा पुन्हा अविनाशला लव्ह ट्रँगलबद्दल प्रश्न विचारते. पण कशिशशी तो कधीही कोणत्याही अँगलने बोलला नसल्याचा अभिनेत्याने इन्कार केला आहे. हे ऐकून कशिश पुढे येते आणि म्हणते खार सांग तू असं बोलला आहेस की नाही?
रजत सांगतो की, अविनाश म्हणतो की, कशिश त्याच्याकडे लव्ह अँगल तयार करण्यासाठी आली होती. कशिश सांगते की ती आणि अविनाशसोबत फ्लर्ट करत होते आणि त्यानंतर अविनाशने लव्ह अँगल बनवण्याचा इशारा तिला देत होता.
कशिशला पुन्हा राग येतो की हे विधान इतके वाईट आहे की ती माझ्याकडे आली. अविनाश म्हणतो की कशिशला दुखावले आहे की ती माझ्यासोबत कोणताही अँगल तयार करू शकली नाही. त्यानंतर कशिश अविनाशला वुमनलायझर म्हणतो. अविनाश म्हणतो माझ्या नावाने प्रसिद्धी घेऊ नकोस. यामुळे कशिश आणखी संतापते आणि ओरडते आणि अविनाशला म्हणते की, तुझ्या कानशिलात मारेल मी, तू काय हृतिक रोशन नाहीस. एवढ्या भांडणानंतर अखेर ईशा अविनाशला कशिशची माफी मागायला सांगते. पण अविनाश तरीही माफी मागत नाही आणि त्याचा हा वाद बराच वेळ सुरु असतो.
पुढील भागामध्ये अविनाश मिश्राला इशा सिंह आणखी प्रश्न करते यावर अविनाश मिश्रा संतापतो आणि तो घरातल्या वस्तूची तोडफोड करायला सुरुवात करतो.