(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ चा प्रवास आता हळूहळू बदलत चालला आहे. तीन आठवड्यांनंतर, अखेर घरातून पहिला स्पर्धक घराबाहेर पडणार आहे. यावेळी प्रेक्षकांच्या मताने ज्या स्पर्धकाला बाहेर काढण्यात आले ती दुसरी तिसरी कोणी नसून पोलिश मॉडेल आणि अभिनेत्री नतालिया असल्याचे समोर आले आहे. तसेच आता असे म्हटले जात आहे की घरामध्ये एक नाही तर दोन स्पर्धक बाहेर जाणार आहेत. ‘विकेंड का वार’ ला डबल एव्हिक्शन होणार असल्याचे समजले आहे. तसेच आता हे दोन स्पर्धक कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
तीन आठवड्यांनंतर पहिली एव्हिक्शन
‘बिग बॉस १९’ च्या घरात सुरुवातीपासूनच शोमध्ये खूप ड्रामा, संघर्ष आणि मैत्री पाहायला मिळाली आहे. तसेच, पहिल्या दोन आठवड्यांत कोणताही सदस्य बाहेर पडला नाही. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस, घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढला कारण नामांकन यादीत आवाज दरबार, नगमा मिराजकर, मृदुल तिवारी आणि नतालिया यांची नावे समोर आली आहेत. बिग बॉसचे लाईव्ह अपडेट्स देणाऱ्या पेजवर असे सांगण्यात आले आहे की, वीकेंड का वारमध्ये आता हे स्पष्ट झाले आहे की नतालियाला प्रेक्षकांकडून सर्वात कमी प्रेम मिळाले आणि तिला शोचा निरोप घ्यावा लागला आहे.
‘तो थेट बेडरूममध्ये शिरला अन्…’, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती ?
नतालियाचा छोटा पण प्रसिद्ध प्रवास
बिग बॉसच्या घरात नतालियाची एन्ट्री ग्लॅमरस होती. तिच्या परदेशी पार्श्वभूमीमुळे प्रेक्षकांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. तसेच, ती खेळात मजबूत पकड मिळवू शकली नाही. टास्कमध्ये तिची मेहनत दिसून येत होती, परंतु रणनीती आणि भूमिका घेण्याच्या बाबतीत ती मागे पडली. यामुळेच तिला प्रेक्षकांचा कमी पाठिंबा मिळाला आणि तिसऱ्या आठवड्यात तिला ‘बिग बॉस’ च्या घराबाहेर पडावे लागले आहे.
#Exclusive !!
(Double Eviction) #Natalya & #NagmaMirajKar have been Eliminated from #BiggBoss19— Livefeed Updates (@BBossLivefeed) September 12, 2025
नगमा मिराजकर देखील पडली बाहेर
फक्त नतालियाच नाही, यावेळी आवाज दरबारची मैत्रीण नगमा मिराजकर देखील घराबाहेर पडताना दिसणार आहे. यावेळी एक नाही तर दोन स्पर्धक घराबाहेर पडतील अशा डबल एव्हिक्शनबद्दल आधीच चर्चा होती. आता असेच काहीसे दिसून आले आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून दोन स्पर्धक बाहेर पडणार आहे.
फराह खान वीकेंडची होस्ट असणार
यावेळी वीकेंड का वार थोडा खास असणार आहे. कारण, सलमान खानच्या अनुपस्थितीत, चित्रपट निर्मात्या फराह खान हा वार होस्ट करताना दिसणार आहेत. फराह तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते आणि तिने कोणताही आढेवेढे न घेता स्पर्धकांना आरसा दाखवला. तिने बसीर अली आणि नेहल चुडासमा यांना सर्वात जास्त फटकारले. फराहने बसीरवर टीका केली आणि म्हणाली की तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला मानतो आणि गांभीर्याने खेळत नाही. त्याच वेळी नेहलवर प्रश्न उपस्थित करताना फराह म्हणाली की तिची गेम स्ट्रॅटेजी खूप कमकुवत आहे आणि ती फक्त महिला कार्ड खेळताना दिसत आहे.
प्रेक्षकांसाठी आश्चर्य
सलमान खानच्या जागी फराह खानचे आगमन प्रेक्षकांसाठी एक मोठे आश्चर्य असणार आहे. फराहच्या कडक क्लासने हे दाखवून दिले आहे की, घरातील सदस्यांचा पुढचा प्रवास सोपा होणार नाही. आता प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या मजबूत गेम प्लॅनसह पुढे जावे लागेल, अन्यथा पुढच्या आठवड्यात कोणावरही एलिमिनेशनची तलवार येऊ शकते.