(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठीसह आता बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आताच्या घडीची हायेस्ट पेड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई तिच्या वेगवेगळ्या भूमिका मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. पण ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे. नवीन वर्षाची सुरुवात सईने एकदम अडवेंचर करत केली आणि या मागचं कारण देखील तितकच खास आहे. तर सई सध्या पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असून फक्त आवड म्हणून नाही तर पायलट होण्यासाठी सई याचं खास शिक्षण घेत आहे.
काही दिवसांपूर्वी व्हर्सेटाइल अभिनेत्री सई ताम्हणकरने पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असल्याचं तिच्या प्रेक्षकांना सांगितलं आता अभिनयाच्या सोबतीने सई करिअरची वेगळी वाट म्हणून पॅराग्लायडिंग पायलट बनली आहे. प्रेक्षकांनी तिच्या नव्या प्रवासाला तर शुभेच्छा दिल्या पण अगदी बॉलिवूड मधल्या काही बड्या स्टार्सनी तिच्या या खास कृत्याचं कौतुक केलं आहे. सईने सोशल मीडियावर तिच्या पॅराग्लायडिंगचा एक खास व्हिडिओ शेअर केला असून हे तिचं पॅराग्लायडिंग पायलट म्हणून सोलो फ्लाईंग होत सईची जिद्द कमालीची आहे आणि तिच्या मित्र मंडळीने देखील आता तिच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देऊन अभिनेत्रीच खास कौतुक केले आहे.
नव्या वर्षाची नव्या करिअर सोबत सईने सुरुवात केली आणि पायलट म्हणून तिचा हा प्रवास तिला समृध्द संपन्न अनुभव देऊन जाणारा आहे असं देखील सईने सांगितले आहे. आकाशावर मनापासून प्रेम करणारी सई आता चक्क आकाशाला गवसणी घालताना दिसते आहे. यावेळी लेटेस्ट पोस्टमध्ये तिने अवकाशात झेप घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि सई म्हणते “प्रेरणा, शोध, धाडस, परिवर्तन. तुम्ही जसे आहात तसेच राहणं नेहमीच मुक्तता देणारं असतं.’ असे लुहुँ सईने ही पोस्ट शेअर केली आहे. सईने हा प्रवास खूपच रोमांचक, शुद्ध आणि पूर्णत्व देणारा असल्याचे देखील म्हंटले आहे.
सैफ अली खानच्या उपचारांसाठी किती खर्च झाला? मेडिक्लेमचा आकडा आला समोर; डिस्चार्जची तारीखही झाली उघड
सईच्या या व्हिडिओवर बॉलिवुड अभिनेता आर माधवन गायक विशाल दादलानी , शाल्मली खोलगडे यांच्या सोबतीने तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी या कलाकारांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. आणि सईच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बॉलीवूड अभिनेता आर माधवन या पोस्टवर कंमेंट करून म्हणाले, ‘खूप छान… आणि तुझा खूप अभिमान आहे सई.. मलाही हे करायलाच हवं.’ असे लिहून त्यांनी देखील अभिनेत्रीच कौतुक केलं आहे.