(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदान्ना नंतर आता अभिनेता अक्षय खन्नाचा चित्रपटातील जबरदस्त लूक समोर आला आहे. अभिनेत्याचा पोस्टरमधील खतरनाक लुक पाहून चाहते चकित झाले आहते. ‘छावा’ चित्रपटाचे हे पोस्टर इतर रिलीज झालेल्या पोस्टरपेक्षा जास्त चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अक्षय खन्नाचा लूक रिलीज झाला
निर्मात्यांनी मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचा लूक शेअर केला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील त्याचा पहिला लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. निर्मात्यांनी माहिती दिली आहे की हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
शिवानी-अंबर विवाह बंधनात; अनेक मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला लग्न सोहळा
रश्मिका मंदानाचा लूकही समोर आला
मॅडॉक फिल्म्सने ‘चावा’ चित्रपटातील महाराणी यशुबाईच्या भूमिकेत रश्मिकाचे दोन पोस्टर्स रिलीज केले आहेत. एका पोस्टरमध्ये रश्मिका मंदान्ना हसताना दिसत आहे. या नवीन लूकमध्ये, रश्मिका जड दागिन्यांसह एखाद्याकडे पाहताना दिसत आहे. आणखी एक फोटो आहे ज्यामध्ये रश्मिका खूप गंभीर अवतारात दिसून येत आहे. अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
Darr aur dehshat ka naya chehra – Presenting #AkshayeKhanna as Mughal Shahenshah Aurangzeb, the ruthless ruler of the Mughal Empire!#ChhaavaTrailer out tomorrow.
Releasing in cinemas on 14th February 2025. #Chhaava #ChhaavaOnFeb14 pic.twitter.com/g14Fbiavse
— Maddockfilms (@MaddockFilms) January 21, 2025
विकी कौशलचे पात्र लक्षवेधी
‘छावा’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विकी कौशल सिंहासनावर बसलेला दिसत आहे. तो मराठा साम्राज्याचा इतिहास आणि वैभव रुपेरी पडद्यावर आणण्यास सज्ज असल्याचे दिसते. विकी कौशल या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे, त्याने संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘छावा’ चित्रपटात शिवाजी महाराजांचे पुत्र शंभाजी महाराज यांची कथा दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मण उतेरकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीने भूमिकांमधील वैविध्य जपत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले!
‘छावा’चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित
हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मॅडॉक फिल्म्सने छावाची निर्मिती केली आहे. त्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. आज तो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.