(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या आगामी “चिडिया” या हिंदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. मेहरान अमरोही लिखित आणि दिग्दर्शित, ‘चिडिया’ ही एक आठवण आहे. या चित्रपटामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी पाहायला मिळणार आहे.
Met Gala 2025: चाहत्यांनी केली प्रियांकाच्या लूकची ‘या’ अभिनेत्रीशी तुलना, ‘देसी गर्ल’ झाली ट्रोल?
मुंबईतील चाळीच्या घरात राहणाऱ्या शानू आणि बुआ या दोन उत्साही भावांची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. केवळ कल्पनाशक्ती, आशा, त्यांची आई आणि समाजातील लोकांच्या मदतीने ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा खूप मोठ्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतात? मुले त्यांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ज्या अदृश्य लढाया लढतात त्याची एक रंजक गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ही कथा नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधणार आहे.
INTERNATIONALLY ACCLAIMED FILM ‘CHIDIYA’ POSTER UNVEILS – 23 MAY 2025 RELEASE… A quiet tribute to the invisible battles children fight to keep their dreams alive… #SmileyFilms and #KeyMediaWorks unveil the official poster of #Chidiya.#Chidiya – which has earned tremendous… pic.twitter.com/lmYDudvWkE
— taran adarsh (@taran_adarsh) May 5, 2025
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मेहरान अमरोही म्हणाले की, “चिडिया हे बालपणाला लिहिलेल प्रेमपत्र आहे. हा चित्रपट उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहणाऱ्या लोकांबद्दल आहे जी स्वप्न कधीही जुनी होत नाही. यासगळ्याची हा चित्रपट शांतपणे आठवण करून देतो. या चित्रपटात अभिनेते विनय पाठक, अभिनेत्री अमृता सुभाष, इनामुलहक, ब्रिजेंद्र कला आणि उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंटने करणार आहे.
शंकर महाराज यांची जीवन पटकथा आता रूपेरी पडद्यावर, “अवलिया” चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच!
जवळजवळ एक दशकापूर्वी पूर्ण झालेला, ‘चिडिया’ चित्रपटाने आधीच जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे, चेक रिपब्लिक (झ्लिन आयएफएफ), द नेदरलँड्स (सिनीकिड), द यूएसए (एसएआयएफएफ), रशिया (स्पिरिट ऑफ फायर आयएफएफ), इराण (मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आयएफएफ) आणि त्यापलीकडे असलेल्या महोत्सवांमध्ये मने जिंकली आहेत. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले अजून, आता सिनेमागृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. “चिडिया” येत्या २३ मे २०२५ पासून संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.