फोटो सौजन्य - Social Media
सिनेमात Swagstar शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रश्मीकाला शाहिदची प्रेयसी दाखवण्यात आली आहे, तर क्रिती त्यांची मैत्रीण दाखवण्यात आली आहे. सिनेमा पाहण्यासाठी तिघांचे चाहतेमंडळी उत्सुक झाले आहेत. त्यात क्रितीला ग्लॅमर क्वीन दाखवण्यात आली आहे. तिला पाहण्यासाठी चाहतेमंडळी तर आतुर झाले आहेत.
ट्रेलरमध्ये भन्नाट स्टारकास्ट दिसून येत आहे. शाहिद कपूर, क्रिती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांच्यातील केमिस्ट्री खूपच फ्रेश आणि मजेशीर वाटतेय. शाहिदचा लूक आणि त्याचा कॉमिक टाईमिंग नेहमीप्रमाणेच भारी आहे. सिनेमाचं शूटिंग लंडन आणि युरोपमधील अतिशय सुंदर लोकेशन्सवर झाल्याचं ट्रेलरमध्ये दिसतंय. विजुअल्स खूपच रिच आणि ग्लॅमरस आहेत. बॅकग्राउंडला ऐकू येणारी ‘जब तलक’ आणि ‘तुझको’ सारखी गाणी लगेचच लक्ष वेधून घेतात. म्युझिक या सिनेमाचा खूप मोठा प्लस पॉईंट ठरणार हे नक्की. तीन अगदी वेगळ्या स्वभावाचे मित्र जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा त्यांच्या मैत्रीत आणि नात्यात होणारा गोंधळ (Chaos) यात दाखवला आहे.
कॉकटेल 2 चा ट्रेलर पाहून काय म्हणाले चाहते?
कॉकटेल 2 चा ट्रेलर पाहून काही चाहत्यांनी उत्सुकता जाहीर केली आहे. कमेंट्स केले आहेत की, “चित्रपटाचं ठाऊक नाही पण गाणे चांगले आहेत”, “लवकरात लवकर ‘तुम ही हो बंधू 2.0’ गाणं प्रसिद्ध करा” अशा अनेक कमेंट्स आले आहेत. प्रीतमचे संगीत हे चित्रपट गाजवणार हे नक्की!






