फोटो सौजन्य - Social Media
काय होती पोस्ट?
Nehal Chudasama ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने नटापटा केला आहे. परंतु, या पोस्टमध्ये अभिनेत्री अगदी नव्या नवरीसारखी नटली आहे. त्यामुळे अभिनेत्रीला केवळ तिच्या चाहत्यांनीच नाही तर सिनेक्षेत्रातील मोठमोठ्या अभिनेत्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत तसेच वैवाहिक आयुष्यासाठी अभिनंदन केले आहे. परंतु, या दरम्यान नेहलने एक मोठा ट्विस्ट दिला आहे. तिने कॅप्शनमध्ये ‘Still processing this day’ असे नमूद केले आहे. तसेच वराचे फोटो शेअर केले नाहीत, त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि काही अभिनेत्यांमध्ये प्रश्नचिन्ह नक्कीच होता.
काय आहे सत्य?
त्या पोस्टनंतर आज पुन्हा एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सगळं सत्य आणि ‘तो’ Twist समोर आला आहे. त्यामध्ये ती त्याच नवरीच्या वेशात आहे परंतु कॅप्शनमध्ये ‘“Qinniya Soni” उद्या येणार!’ असे नमूद केले आहे, जे पाहून सत्य उलगडले आहे. एकंदरीत, Nehal Chudasama ने नव्या गाण्यासाठी हा look केला आहे, तसेच त्याचे photos शेअर केले आहेत.
अभिनेत्रीचं नवंकोरं गाणं!
अभिनेत्रीचं लग्नावर आधारित गाणं Qinniya Soni आता तिच्या चाहत्यांना ऐकता तसेच पाहता येणार आहे. QARAN या गाण्याचा गायक, गीतकार तसेच त्यानेच या गाण्याला संगीताने बद्ध केले आहे. गाण्यात Nehal Chudasama तसेच स्वतः QARAN झळकला आहे.






