(फोटो सौजन्य- Social media)
1997 मध्ये सनी देओल स्टारर चित्रपट बॉर्डरने यशाचे नवे उदाहरण ठेवले होते. दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या देशभक्तीपर चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. काही काळापूर्वी बॉर्डर म्हणजेच बॉर्डर 2 च्या सिक्वेलची घोषणा झाली आणि मुख्य अभिनेता म्हणून सनी देओलचे नाव निश्चित झाले. दुसरीकडे, बॉर्डर 2 च्या इतर स्टारकास्टची चर्चा देखील होत आहे. आता बातम्या येत आहेत की, अभिनेता वरुण धवन बॉर्डरच्या सिक्वेलमध्ये उतरणार आहे.
‘बॉर्डर 2’मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री
गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ ‘बॉर्डर 2’ च्या कलाकारांमध्ये सामील झाला आहे. सनी देओलच्या नेतृत्वाखालील या चित्रपटात वरुण धवन देखील दिसणार आहे. सनी देओलने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. दिलजीत सांझचे स्वागत करणारा व्हिडिओ शेअर करत सनी देओलने लिहिले, “फौजी दिलजीत दोसांझचे ‘बॉर्डर 2′ बटालियनमध्ये स्वागत आहे.” व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीत दिलजीतचा आवाज ऐकू येतो जिथे तो म्हणतो, “इस देश के तरफ उठने वाली हर नजर झुक जाती है खौफ से, इन सरहदो पर जब गुरु के पास पेहरा देते है.’ असा दिलजीत दोसांझचा आवाज ऐकू येत असून हा व्हिडीओ शेअर केला आहे. वरुण धवननंतर आता चाहत्यांना दिलजीत दोसांझचा देखील या चित्रपटामध्ये अभिनय पाहायला मिळणार आहे. त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
हे देखील वाचा- ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीने लावली पाण्यात आग, अरबाजच्या हृदयावर केले वार!
बॉर्डर २ मध्ये दिसणार वरुण धवन
सध्या वरुण धवन ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातील कॅमिओमुळे चर्चेत आहे. आता बॉर्डर २ बाबतही त्यांच्या नावाची चर्चा तीव्र झाली आहे. पिंकविलाच्या बातमीनुसार, वरुण सनी देओलसोबत बॉर्डर 2 मध्ये दिसणार आहे. तसेच वरुणसह आणखी एक अभिनेता सनी देओलसोबत एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. बॉर्डर 2 साठी वरुणचे नाव समोर आल्याने मनोरंजन वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन आणि भाऊ रोहित धवन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. एक स्टार किड म्हणून वरुण धवनने 2012 मध्ये निर्माता करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला.