(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाने लोकांची मने जिंकली. अजय देवगणने चित्रपटात जबरदस्त अभिनय केला. हा चित्रपट इतका हिट झाला की चित्रपट निर्मात्यांनी सात वर्षांनी ‘दृश्यम २’ हा चित्रपट लगेच प्रेक्षकांच्या भेटीस आणला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. ‘दृश्यम’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. साउथ इंडस्ट्रीत तयार झाल्यानंतर त्याचा हिंदी रिमेकदेखील सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागातील थरारक सस्पेन्स आणि दुसऱ्या भागातील बुद्धीचा खेळ प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेला.हा चित्रपट केवळ मोहनलालच्या कारकिर्दीतीलच नाही तर अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.
अजय देवगणचा दृश्यम हा मोहनलाल अभिनीत मल्याळम चित्रपट दृश्यमचा रिमेक आहे. मोहनलालचा दृश्यम हा चित्रपट आधीच दोन भागात प्रदर्शित झाला आहे आणि अजय देवगणचा चित्रपट देखील दोन भागात प्रदर्शित झाला आहे. मोहनलाल आणि अजय यांनी पाच महिन्यांपूर्वी दृश्यम ३ चे शूटिंग स्वतंत्रपणे सुरू केले होते.
आता, लवकरच एक चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज आहे. दृश्यम ३ चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि दिग्दर्शकाने एक मोठी अपडेट दिली आहे. दृश्यम ३ चे हिंदी आणि मल्याळम दोन्ही आवृत्त्या पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. अजय देवगण अभिनीत हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नसले तरी, अभिनेता मोहनलाल अभिनीत दृश्यम ३ चे मल्याळम आवृत्ती निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. याचा अर्थ मल्याळम आवृत्ती पहिला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.






