(फोटो सौजन्य - x अकाउंट)
भारत-पाकिस्तान तणावात FWICE ने बॉलिवूड चित्रपटसृष्टीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने भारतीय चित्रपट निर्मात्यांना तुर्कीमध्ये चित्रीकरणाचे ठिकाण निवडण्यापूर्वी पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. हे तुर्कीये यांनी पाकिस्तानला सतत पाठिंबा दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि हितसंबंधांशी संबंधित बाबींमुळे हा विचार करण्यात आला आहे. आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
FWICE चित्रपट उद्योगाला एकतेचे आवाहन
FWICE चित्रपट उद्योगातील कामगार, तंत्रज्ञ आणि कलाकार अशा ३६ वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधित्व करते. FWICE ने एक प्रेस रिलीज जारी करत म्हटले आहे की, “आम्ही सर्व चित्रपट निर्मिती संस्था, दिग्दर्शक, अभिनेते आणि क्रू सदस्यांना देशासोबत एकता दाखवण्याचे आणि तुर्की त्यांचे धोरण बदलत नाही तोपर्यंत तिथे चित्रीकरण करू नये असे आवाहन करतो.”
‘Bhool Chuk Maaf’ ची ओटीटी रिलीज डेट ढकलली पुढे ? राजकुमार रावचा चित्रपट का अडकला वादात ?
FWICE “राष्ट्र प्रथम” या तत्त्वावर ठाम आहे.
FWICE ने म्हटले आहे की, जेव्हा भारतावरील दहशतवादी हल्ल्यांच्या संदर्भात तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा “राष्ट्र प्रथम” या तत्त्वाचा पुनरुच्चार केला. भारताविरुद्ध उभ्या असलेल्या कोणत्याही देशात गुंतवणूक करणे चुकीचे आहे असे त्यांचे मत आहे. FWICE ने म्हटले आहे की तुर्कीने केवळ राजनैतिकदृष्ट्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही भारताच्या हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेतली आहे, जी भारतीय चित्रपट उद्योगासाठी चिंतेची बाब आहे. संघटनेने असेही म्हटले आहे की चित्रपट उद्योग भारतीय संस्कृती आणि मूल्यांमध्ये खोलवर रुजलेली आहे, म्हणून देशाच्या प्रतिष्ठेला किंवा सुरक्षिततेला धक्का पोहोचेल असे कोणतेही पाऊल उचलू नये.
सत्य घटनेवर आधारित ‘शातिर The Beginning’ मराठी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर लाँच!
दरम्यान, FWICE चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे विधान समोर आले आहे. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव आणखी वाढला आहे.