सौजन्य: सोशल मीडिया
‘भूल भुलैया’ पासून ते ‘गो गोवा गॉन’पर्यंत जेव्हा जेव्हा कॉमेडी आणि हॉरर चित्रपट बनवण्यात आले तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना त्याला उत्तम प्रतिसाद दिला. मॅडॉक फिल्म्सने पुन्हा एकदा हॉरर-कॉमेडी भारतात परत आणली. इतकंच काय, जेव्हा मोठ्या पडद्यावर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ सारखे बिग बजेट आणि बिग स्टार चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडपडत होते, तेव्हा ‘मुंज्या’ चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. आता निर्माते आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट काकुडा घेऊन आले आहेत जो आज ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. मॅडॉक फिल्म्स पुन्हा एकदा एक हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’ घेऊन आले आहेत. हा चित्रपट ZEE5 वर रिलीज झालेला आहे. परंतु, हा चित्रपट ना ‘स्त्री’ सारखा बनू शकला ना ‘मुंज्या’ सारखी जादू पसरवू शकला आहे.
कसे आहे कथानक ?
सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम स्टारर ‘काकुडा’ ही कथा याच नावाच्या भूताच्या जुन्या लोककथेवर आधारित आहे. रितेश या चित्रपटात भुताच्या शिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ज्याने आपल्या शानदार कारकिर्दीत 127 चेटकीण, 72 व्हॅम्पायर, 37 भुते आणि 3 जिन्स यांना वश केले आहे. चित्रपटाची सुरुवात रतौली नावाच्या गावात होते. जिथे रहिवासी ‘काकुडा’ नावाच्या भूताने हैराण झाले आहेत. रतौली गावात राहणाऱ्या लोकांना दर मंगळवारी सकाळी 7.15 वाजता घराचा छोटा दरवाजा उघडावा लागतो. जर एखादा माणूस हे करू शकत नसेल तर त्याला काकुडा दिसतो आणि 13 दिवसांच्या आत अचानक त्याचा मृत्यू होतो. दरम्यान, रतौली गावात राहणारा सनी (साकिब सलीम) दुसऱ्या गावात राहणाऱ्या इंदूच्या (सोनाक्षी सिन्हा) प्रेमात पडतो.
डायरेक्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. ज्याने ‘मुंज्या’ आणि ‘झोंबिवली’ सारखे हिट हॉरर कॉमेडी केले आहे. मात्र, या चित्रपटातील काकुडा भुताचा कणखरपणा समोर आणण्यात चित्रपट निर्माते अपयशी ठरले आहेत. संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शक आणि लेखक अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग ‘स्त्री’ आणि ‘भेडिया’ची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या चित्रपटाचा सर्वात कमकुवत भाग म्हणजे त्याची पटकथा आणि त्यात सुधारणा आवश्यक आहे. अनेक ठिकाणी ‘काकुडा’ हा स्त्री चित्रपटाची नक्कल असल्यासारखा दिसतोय. सिच्युएशनल कॉमेडी कुठेच दिसत नाही या चित्रपटात इतरही अनेक कमतरता दिसून येत आहेत. तुम्ही फक्त बसून हसण्याची वाट पाहू शकता. एकंदरीत या चित्रपटाच्या निर्माते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत.
चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया
भारतीय भयपट जुन्या लोककथेवर आधारित आहे त्यामुळे कथेकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या काळात ‘तुंबाड’ आणि ‘मुंज्या’ सारख्या चित्रपटांनीही सर्वांच्या खूप अपेक्षा वाढवल्या आहेत. पण, काकुडाच्या बाबतीत असं झालं नाही. जवळपास दोन तासांचा हा चित्रपट काही काळानंतर इतका कंटाळवाणा होतो की तो इतका लांब का बनवला गेला याचे आश्चर्य वाटते. चित्रपटाचा अर्धा तास कमी केला असता तर कदाचित चित्रपट पाहण्यासारखा झाला असता. VFX आणि स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने तयार केलेले भूत तुम्हाला घाबरवू शकत नाही किंवा पार्श्वभूमीत वाजणारे भयानक संगीतदेखील तितकेसे प्रभावी नाही. मुलांना हा चित्रपट आवडू शकतो कारण त्यात त्यांना हसवण्याच्या गोष्टी आहेत. हा चित्रपट कदाचित उत्तम हॉरर कॉमेडी नसेल, परंतु तो मजेदार आणि आनंददायक आहे. हा चित्रपट एकदा बघता येईल. काकुडाला 2.5 स्टार्सचे रेटिंग मिळाले आहे.