(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारताने आशिया चषक 2025 मध्ये शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयानंतर देशभरात आनंदाचा जल्लोष सुरु आहे. लाखो चाहते, सेलिब्रिटी, माजी खेळाडू आणि सामान्य नागरिक सोशल मीडियावर आपापल्या भावना व्यक्त करत आहेत. सर्व भारतीय सध्या जल्लोष साजरा करत आहेत आणि टीम इंडियाचं कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते भारताच्या विजयाने भारावून गेलेले दिसत आहेत.
भारतीय संघाने आशिया चषक 2025 मध्ये पाकिस्तानवर थरारक विजय मिळवत स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकली, ही अत्यंत गौरवास्पद कामगिरी मानली जात आहे. भारतीय संघाने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे.
Bigg Boss 19: या आठवड्यात ‘हे’ ८ स्पर्धक अडकले नॉमिनेशनच्या जाळ्यात, कोणाचा पत्ता होणार कट्ट?
अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
अनुपम खेर यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले आहे, “भारत माता की जय” अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये ते भावुक झालेले दिसत आहेत. ते म्हणतात “भारत माता की जय, खूप छान, कमाल मॅच, जिंकणार म्हणजे जिंकणार खूप आनंदी आहे मी; काय बोलू कळत नाहीये. मला माझ्या देशाचा अभिमान आहे, आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. खूप उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली आहे. वंदे मातरम् भारत माता की जय” असं म्हटलं आहे.
भारत माता की जय! ❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️ #AsiaCupFinal #TeamIndia #Cricket pic.twitter.com/yXCUUqkWhl — Anupam Kher (@AnupamPKher) September 28, 2025
‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…
भारताचा विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये भारताच्या विजयाच्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पाहायला मिळाले. संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, त्या ऐतिहासिक विजयानंतर अनुपम खेर यांचं देशप्रेम ओसंडून वाहताना दिसलं. त्यांनी भारतीय संघाचं भरभरून कौतुक केलं