(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या सुरु असलेल्या कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत शंभर चित्रपट करणं हे थोड कठीण झालं आहे. परंतु, ही गोष्ट साध्य करून प्रत्येक भूमिकेला न्याय देऊन सातत्यपूर्ण वैविध्यपूर्ण कलाकृती करून प्रेक्षकांच मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओकने हे करून दाखवलं आहे. पहिला चित्रपट ते आता चित्रपटाची शंभरी या अभिनेत्याने गाठली आहे. हा प्रवास अखंड सुरू ठेवत कायम वेगवेगळ्या कलाकृती करून प्रसादने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली आहे.
प्रसाद ओकचा पहिला चित्रपट “अष्टरूपा वैभवी लक्ष्मी माता” ते नुकताच प्रदर्शित होणार “वडापाव” चित्रपटापर्यंतचा अभिनेत्याचा प्रवास खरतर खूप खडतर होता. आणि आता या क्षेत्रात शंभरी पूर्ण करून अभिनेत्याने मोठा पल्ला गाठला आहे. वडापाव हा चित्रपट अभिनेता म्हणून प्रसादचा हा शंभरावा चित्रपट असणार आहे. तरी या सगळ्या प्रवासात अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या मग त्यात अभिनयाच्या सोबतीने दिग्दर्शन असो, निमिर्ती, लेखन किंवा गीतकार असो या सगळ्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन अभिनेत्याने जिंकले.
कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस
प्रसादने मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीत दर्जेदार कामगिरी केली अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले. तसेच त्याने सिनेमातही आपली छाप सोडली आहे आणि आज तो शतकी मैलाचा दगड गाठतो आहे. या आनंदाबाबत अभिनेत्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. त्यांच्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालं आहे असं अभिनेत्याचं म्हणणं आहे. अभिनेता नक्की याबद्दल काय म्हणाला जाणून घेऊयात.
या प्रवासाबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला की, ‘माझ्यासाठी शंभर चित्रपटाचा प्रवास अनुभव हा अत्यंत रोमांचककारी आहे. या सगळ्या चित्रपटातील भूमिका मला खूप काही शिकवून जाणाऱ्या आहेत. 100 चित्रपटात काम करताना आपण ज्यांना गुरु मानतो अश्या अनेक दिग्गज कलाकार अशोक सराफ, मोहन जोशी, विक्रम गोखले यांच्यासोबत काही निवडक चित्रपटात काम करता आलं. या सगळ्या प्रवासात मला एकदा अभिनेते मोहन जोशी नी सांगितलं होत तू हिरो करतोस, व्हिलन करतोस, तु गेस्ट ॲपरन्स करतोस, कॉमेडी करतोस, मालिका करतोस तू बहुआयामी आहेस.’
‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई
पुढे अभिनेता म्हणाला, ‘परंतु ही सगळी कारकिर्दीची एक बाजू आहे आणि दुसरी बाजू ही एक निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून आहे. आज 100 चित्रपटाचा आढावा घेताना मागे वळून बघताना मी पाहतो की मला किती निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी पुन्हा काम करण्याची संधी दिली आणि यातून उत्तम प्रोजेक्ट्स घडले. या साठी मी खूप समाधानी आहे. माझ्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल सुर्वे तिथपासून माझ्या शतकी चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणजे मी स्वतः प्रसाद ओक. आजवर ज्यांनी मला या सगळ्या 100 चित्रपटात काम करण्याची संधी दिली असे सगळे निर्माते दिग्दर्शक यांचा मी कायम ऋणी आहे.’
अभिनेत्याने प्रेक्षकांचे आभार मनात म्हटले, ‘२८ वर्षाच्या प्रवासात प्रत्येक माध्यमातून मला रसिक प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी आज शंभर चित्रपटाच्या पल्ला गाठला आहे. चित्रपट, रंगभूमी, मालिका, गाणं, दिग्दर्शन अश्या माझ्या प्रत्येक कलाकृतीवर आज प्रेक्षकांनी प्रेम केलं पाठिंबा दिला आणि म्हणून हा प्रवास मी करू शकलो. आणि म्हणूनच रसिक प्रेक्षकांचे मी माझ्या 100 व्या चित्रपटाच्या निमित्ताने “मनःपूर्वक आभार” मानतो.’ तसेच, अभिनेत्याचा ‘वडापाव’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.