(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या संदर्भात कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैना यांना आज सोमवारी महाराष्ट्र सायबर सेलने दुसरे समन्स पाठवले आहे. या शोच्या संदर्भात सायबर सेलने समयला दुसऱ्यांदा त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यांना १९ मार्च रोजी त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच आता कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैना हजर राहणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आज जबाब नोंदवले जाणार होते
वृत्तसंस्था एएनआयनुसार, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील आक्षेपार्ह टिप्पण्या आणि अश्लील मजकुराच्या संदर्भात आज सोमवार १७ मार्च रोजी समय रैनाला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते, परंतु तो महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर झाला नाही. आता सायबर सेलने विनोदी कलाकाराला दुसरे समन्स बजावले आहे. आणि हजार राहण्यास सांगितले आहे.
Mumbai | Maharashtra Cyber Cell has served a second summon to comedian and YouTuber Samay Raina to appear before it on 19th March to record his statement in connection with India’s Got Latent show. He was summoned today to record his statement, but he did not appear before…
— ANI (@ANI) March 17, 2025
रणवीर अलाहाबादियाने केली अश्लील टिप्पणी
युट्यूबर रणवीर अलाहाबादिया समय रैनाच्या शोमध्ये आला होता. त्याने शोमध्ये पालकांबद्दल आणि कुटुंबाबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. यावर मोठा गदारोळ झाला. रणवीरवर बरीच टीका झाली. याशिवाय रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि अपूर्वा मुखिजा यांच्यासह अनेक लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.
व्हिडिओ कॉलवर निवेदन देण्याची विनंती केली होती.
या शोसाठी आधी समय रैनाला बोलावण्यात आले होते पण तो परदेशात असल्याने तो उपस्थित राहिला नाही. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपले म्हणणे नोंदवण्याची विनंती केली होती. तथापि, सायबर सेलने त्यांची विनंती नाकारली आणि त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले. आता त्याला १९ मार्च रोजी त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.