फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : टेलिव्हीजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. कालच्या भागांमध्ये घोषणा करण्यात आली की आता वीकेंडचा वाॅर हा शुक्रवारी आणि शनिवारी आयोजित करण्यात येणार आहे. काल सलमान खान शुक्रवारच्या वाॅरमध्ये आला होता. यावेळी त्यांनी घरातील स्पर्धकांची शाळा घेतली त्याचबरोबर काही स्पर्धकांसोबत मज्जा मस्ती देखील करतांना दिसला. आज बिग बॉसच्या घरामध्ये दोन वाईल्ड कार्ड सदस्य एन्ट्री करणार आहेत यामध्ये हे दोन वाइल्ड कार्ड कशा प्रकारचा खेळ खेळतात यावर बिग बॉस प्रेमींची नजर असेल. त्यामध्ये पहिला वाईट सदस्य आहे दिग्विजय राठी आणि दुसरी वर्ल्ड सदस्य आहे कशिश कपूर.
दिग्विजय राठी आणि कशिश कपूर हे दोघे एकाच रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी फायनलमध्ये जाण्यासाठी त्या दोघांना एक संधी देण्यात आली होती, यामध्ये असे सांगण्यात आले होते की तुम्हाला पैसे हवे आहेत की तुम्हाला फायनलमध्ये खेळायचे आहे. यावर कशिश कपूरने पैसे घेण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड मोठे वाद झाले होते आणि याच कारणामुळे त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये आता पुन्हा एकत्र आणण्यात आले आहे. अनेक मुलाखतींमध्ये सुद्धा दोघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये बरेच बोलले होते.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : बिग बॉस 18 च्या घरात नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची होणार एंट्री! कोणत्या स्पर्धकांना करणार टार्गेट
आता एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये अभिनेता करणवीर मेहरा बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या पुतळ्यांना लाथडताना दिसत आहे. बिग बॉसने त्याला एक टास्क दिला होता यामध्ये त्याला टॉप दोन सदस्य कोण असणार यासंदर्भात त्याला घरामधील एक एक सदस्याला घराबाहेर काढायचा आहे. ज्यामध्ये सुरुवातीला एलिस कौशिक आणि ईशा सिंग हिला बाहेर काढायचे ठरवले आहे. त्यानंतर त्याने अविनाश मिश्रा याचा पुतळा घेऊन म्हणाला की, “याची अजिबात गरज नाही आहे इथे”. त्यानंतर त्याने व्हिव्हियन डिसेनाला टॉप दोन मध्ये ठेवले आहे. यावर सलमान खानने त्याला म्हटले की तुला व्हीव्हीएन डिसेनाला टॉप २ मध्ये ठेवायचे आहे का?
TOMORROW PROMO#KaranveerMehra chose Alice, Avinash and Eisha to evict them from the house.
He choses VD as top 2VD : ye agar mujhe nahi rakhega toh isko content kaha se milega, jalega kis se
i can see the desperation on his face 😂#BiggBoss18https://t.co/lcOvMFN0bO
— 𝐒𝐞𝐧𝐩𝐚𝐢🥂 (@Oyye_Senpai) November 1, 2024
यावर व्हिव्हियन डिसेना म्हणतो की, जर मी नसतो या घरामध्ये तर ह्याला फुटेज कशी मिळणार आणि हा जळणार कोणावर? यावर आता करणवीर मेहराचा उत्तर काय असेल हे पाहणे मनोरंजक ठरेल कारण की, त्याचे वन लाइनर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर त्याचे बोलणे बरेच जणांना पटते आणि त्याला बाहेरून सध्या सोशल मीडिया वरून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.