(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महिमा चौधरीच्या नवीन व्हिडिओमुळे तिच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. अलिकडेच सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये असे सूचित होते की वयाच्या ५२ व्या वर्षी महिमा चौधरीने पुन्हा लग्न करत आहे. ज्यात अभिनेत्री जेष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांच्यासोबत वधूच्या पोशाखात पोज देताना दिसली आहे. व्हिडिओमध्ये आणखी एक जोडपे देखील दिसत आहे. तसेच, व्हिडिओमध्ये महिमा चौधरी आणि संजय मिश्रा एकमेकांशी प्रेमाने बोलत असल्याचे दिसत आहे. त्यांना अचानक लग्नाच्या पोशाखात पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महिमा चौधरी संजय मिश्राची पत्नी बनली
महिमा चौधरीने प्रत्यक्षात दुसरे लग्न केलेले नाही, पण हा व्हिडिओ तिच्या आगामी चित्रपट “दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी” मधील आहे ज्यामध्ये संजय मिश्रा त्यांच्यासोबत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, महिमा चौधरी वधूच्या वेशात दिसली, तर संजय मिश्रा वराच्या भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ हळूहळू समोर येत आहेत. संजय आणि महिमा पापाराझींसाठी एकत्र पोज देतानाही दिसले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रमोशनल स्टाईलचे कौतुक करत आहेत.
“दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी” चित्रपटाबद्दल
बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने अलीकडेच तिच्या आगामी “दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी” या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. त्यात संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांचे लूक दाखवण्यात आले होते आणि त्यांच्या पात्रांचाही खुलासा करण्यात आला होता. पोस्टरमध्ये एका ५० वर्षीय पुरूषाचे दुसरे लग्न प्रमाणपत्र दाखवण्यात आले आहे. अभिनेत्रीने कॅप्शन दिले आहे की, “वधू सापडली आहे, आता तयार व्हा कारण लग्नाची मिरवणूक लवकरच निघणार आहे… जवळच्या किंवा दूरच्या चित्रपटगृहांमधून.” असे लिहून या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
“दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी” या चित्रपटामध्ये व्योम आणि पलक लालवानी देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटाची कथा खूपच मनोरंजक आणि कॉमेडी असणार आहे. तसेच, या चित्रपटाची रिलीज डेट अद्यापही निर्मात्यांनी जाहीर केलेली नसून, हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.






