(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आज या भारतात मिर्झापूरच्या राजाला कोण ओळखत नाही? पंकज त्रिपाठी या नावातच एक जादू आहे. आज या अभिनेत्याचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. आज पंकज त्रिपाठी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘स्त्री’, ‘मिमी’, ‘क्रिमिनल जस्टिस’, ‘ओएमजी २’, ‘मसान’, ‘मेट्रो इन दिनॉन’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. पंकज त्रिपाठी यांना २ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, यशाची शिडी चढणे त्यांच्यासाठी इतके सोपी नव्हती त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे तेव्हा कुठे ते एवढे यशस्वी झाले आहेत. ही चमकदार कारकीर्द घडवण्यापूर्वी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अभिनेत्याने दिवस रात्र मेहनत घेतली आहे तसेच अनेक रात्री जेलमध्ये देखील घालवली आहे.
कार्तिक झाला अलिबागकर! घेतली जमीन, मोठमोठ्या कलाकारांची येथे गुंतवणूक
पंकज त्रिपाठी यांनी जेलमध्ये काढली रात्र
पंकज त्रिपाठी जेव्हा बारावीत होते तेव्हा त्यांनी ‘अंधा कुआं’ नावाचे नाटक पाहिले आणि ते रडू लागले. त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर, ते गरीब कुटुंबातून असल्याने मोफत अभिनय शिकता येईल अशी जागा शोधू लागले. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची माहिती मिळाली, ज्यासाठी फक्त पदवी आवश्यक होती. पंकज त्रिपाठी त्यांच्या महाविद्यालयीन काळात भाजपच्या कॅम्पस विंग अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले. त्यांनी एका विद्यार्थी चळवळीतही भाग घेतला होता. ज्यामुळे त्यांना एका आठवड्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला. अभिनेत्याला तुरुंगात मारहाणही करण्यात आली.
८ वर्षांपासून अभिनेत्याला मिळाले नाही काम
एक काळ असा होता जेव्हा पंकज त्रिपाठी कामासाठी हताश होते. ते त्यांचा फोन अशा ठिकाणी ठेवत असत जिथे जास्तीत जास्त नेटवर्क असेल जेणेकरून त्यांचा कोणताही कास्टिंग कॉल चुकणार नाही. तसेच, २००४ ते २०१२ दरम्यान त्यांनी फक्त बेरोजगारी पाहिली आहे. या ८ वर्षांत पंकज त्रिपाठी कॅमेरा पाहण्यासाठी हताश होते. या ८ वर्षात त्यांना कोणतेही काम मिळाले नाही.
पत्नीने सांभाळले कुटुंब
लग्नानंतर पंकज त्रिपाठी त्यांच्या पत्नी मृदुलासोबत मुंबईत आले आणि ते कामाच्या शोधात होते. त्यांची पत्नी मृदुला शिक्षिकेची नोकरी करत असताना. अशा परिस्थितीत पंकज त्रिपाठी काम शोधत होते आणि त्यांची पत्नी घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होती. बराच काळ त्यांची पत्नी त्यांचे घर चालवत असे. दोघांमध्ये असे ठरले होते की जेव्हा पंकज कमाई करायला सुरुवात करेल तेव्हा त्यांची पत्नी काम सोडून विश्रांती घेईल. आज हे जोडपे आनंदी जीवन जगत आहेत. दोघांच्याही कष्टाचे आणि चिकाटीचे फळ या दोघांना मिळाले आहे.