(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. “बर्फी” मधील मूक व्यक्तिरेखेपासून ते “अॅनिमल” मधील एका रागीट आणि हिंसक तरुणापर्यंत, रणबीरने प्रेक्षकांना सातत्याने आश्चर्यचकित केले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याचे कौतुक करताना दिसत असतात. त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असताना, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक आणि संगीतकार पियुष मिश्रा यांनी रणबीरबद्दल एक विधान केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
द लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीत मिश्रा म्हणाले की, वडील ऋषी कपूर, आजोबा राज कपूर ते पणजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यापर्यंत कपूर कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या वारशाचा रणबीर कपूरवर १% देखील भार पडलेला दिसत नाही.
यावेळी त्यांनी रणबीरबरोबर तमाशा आणि रॉक्स्टार या त्याच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला ते म्हणाले, ”रणबीर सेटवर खूप शिस्तप्रिय असतो. एकदा का शॉट संपका की, तो निर्धास्त होतो.”
पीयूष मिश्रा पुढे हसत म्हणाले, ”अरे विचारू नका.. त्याच्याइतका निर्जल्ल माणूस मी पाहिला नाही.”त्यांनी स्पष्ट केले की रणबीर सेटवर पूर्ण इमानदारीने काम करतो.
मुलाखतीत, पियुष मिश्रा यांनी दिवंगत अभिनेता इरफान खानचीही आठवण काढली. ते म्हणाले, “इरफान खूप लवकर निघून गेला मित्रा… मला अजूनही वाईट वाटते. तो एक अद्भुत अभिनेता होता.” पियुष यांनी स्पष्ट केले की जरी तो आणि इरफान जवळचे मित्र नव्हते, तरी त्यांच्यात परस्परांबद्दल खोल आदर होता.
रणबीर कपूरचा वर्कफ्रंट
रणबीर कपूर सध्या संजय लीला भंसाळीच्या महत्वाकांक्षी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहेत. ही फिल्म २०२६ मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, तो ‘रामायण’ चित्रपटाच्या निमित्तानेही चर्चेत आहे. नीतीश तिवारी दिग्दर्शित ही फिल्म दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.






