(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते आणि राजकारणी थलापती विजय यांच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, अभिनेता विजयविरुद्ध चेन्नई पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका इफ्तार कार्यक्रमात मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप या अभिनेत्यावर आहे. तक्रारदाराचा असा दावा आहे की इफ्तार पार्टीला मद्यपी आणि धार्मिक विधीच्या पावित्र्याचा अनादर करणारे लोक उपस्थित होते.
BIGG BOSS OTT 3 विजेती अभिनेत्री देतेय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, म्हणाली, “माझ्या शरीरातील पेशी…”
थलापती विजयवर मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, थलापती विजय यांनी सद्भावना वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असला तरी, त्यामुळे मुस्लिम समुदायाचे नुकसान झाले आहे. शिवाय, संपूर्ण घटनेनंतरही विजयने पश्चात्ताप व्यक्त न करणे किंवा माफी न मागणे त्याच्या संवेदनशीलतेबद्दल आणि धार्मिक भावनांबद्दलच्या आदराबद्दल चिंता निर्माण करते.
इफ्तार पार्टीत थलापती विजयने केली चूक
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, तक्रारदाराने अनेक उदाहरणे देऊन अभिनेत्यावर अनेक आरोप केले आहेत. या अभिनेत्यावर लोकांचा अनादर केल्याचा आणि स्थानिक लोकांच्या भावनांबद्दल असंवेदनशील असलेल्या परदेशी सुरक्षा रक्षकांना कामावर ठेवल्याचा आरोप आहे. आता अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी यावर भर दिला जात आहे. तसेच या बातमीने अभिनेत्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
तक्रारदाराने त्याचा हेतू सांगितला
तक्रारदाराने असेही स्पष्ट केले की त्याने तक्रार प्रसिद्धी हवी होती म्हणून नाही तर भविष्यातील कार्यक्रमांमध्ये आदर आणि प्रतिष्ठा पाहावी यासाठी म्हणून दाखल केली आहे. थलापती विजय यांनी अलीकडेच एक मोठी इफ्तार पार्टी आयोजित केली होती आणि त्यामध्ये ते टोपी घालून नमाज करताना दिसले. अभिनेत्याला या शैलीत पाहून लोक गोंधळले आणि त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरू लागल्या.