(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
विपुल अमृतलाल शाह यांच्या “द केरळ स्टोरी” या चित्रपटाच्या प्रदर्शनाने बरीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या शक्तिशाली कथेमुळे, या चित्रपटाने प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पाडला आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकले. तसेच आता चित्रपटाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. विपुल अमृतलाल शाह यांची निर्मिती असलेला “द केरळ स्टोरी २” हा चित्रपट कडक सुरक्षेत चित्रित करण्यात आला आहे आणि तो येणाऱ्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
केरळमध्ये सेट केलेला “द केरळ स्टोरी” चित्रपटाचा हा सिक्वेल आधीच चित्रित करण्यात आला आहे. अहवालानुसार कथा आणखी गडद आणि अधिक गंभीर असणार आहे. कलाकार आणि दिग्दर्शकाबद्दलची माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “द केरळ स्टोरी २ चे चित्रीकरण अत्यंत नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने करण्यात आले. निर्माते विपुल अमृतलाल शाह यांना चित्रीकरणादरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये असे वाटत होते.” असे त्यांनी सांगितले आहे.
केरळ स्टोरी २ च्या प्रदर्शनाची रिलीज डेट
न्यूज १८ ने एका सूत्राचा हवाला देत पुढे वृत्त दिले की, “सेटवरून कोणतीही माहिती लीक होऊ नये म्हणून कलाकार आणि क्रूला शूटिंग दरम्यान त्यांचे फोन वापरण्याची परवानगी नव्हती.” एका प्रदर्शकाच्या मते, चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे, असेही सूत्राने सांगितले आहे. आता या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘द केरळ स्टोरी’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘द केरळ स्टोरी २’ आता अधिकृतपणे प्रदर्शित होत असल्याने लोकांमध्ये उत्साह वाढला आहे. ‘द केरळ स्टोरी’ ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो प्रचंड हिट झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹८ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी, त्याने ₹१०० कोटींचा टप्पा ओलांडला. ४० दिवसांहून अधिक काळ चित्रपटगृहांमध्ये चाललेल्या या चित्रपटाने हिंदीमध्ये ₹२४१.७४ कोटी आणि जगभरात ₹३०२ कोटींची कमाई केली.






