(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतिक्षा बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींच्या घराबाहेर 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर पोलिस सुरक्षा का वाढवण्यात आली आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाहीय. याचे कारण पोलिसांनी गुपित ठेवलं आहे… असं देखील सांगण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर पोलिस सुरक्षेसह रस्त्यावर बॅरिकेडिंग पण करण्यात आलं आहे.
रविवारी, अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. बिग बींना पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह एवढा वाढला की, पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त ठेवण्याचे निर्णय घेतले. सुरक्षा वाढवल्यामुळे बिग बी पुन्हा चर्चेत आले आहेत. तसेच, त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून ती पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या KBC या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावतात. अशीच हजेरी लावली होती पंजाबी गायक तथा अभिनेता दिलजीत दोसांझने. दिलजीत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलिकडेच, त्याने अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या क्विज रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती 17 मध्ये हजेरी लावली होती. जिथे त्याने आदराने अमिताभ बच्चन यांच्या पाया पडला. पण याच गोष्टीमुळे तो चांगसाच अडचणीच सापडला आहे. त्याला यानंतर एका संघटनेकडून वारंवार धमकी येत आहे.
निर्मात्यांनी शेअर केलेल्या एका क्लिपमध्ये दिलजीत आदराने बिग बींच्या पाया पडताना दिसला.पण हा प्रोमो पाहूनच एपिसोड प्रसारित होण्याच्या आधी, बंदी घातलेल्या खलिस्तानी गट सिख्स फॉर जस्टिस ने व्हिडिओवरून दिलजीतवर निशाणा साधला. खलिस्तानी संघटनेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी अमिताभ बच्चन यांचे पाय स्पर्श केल्याबद्दल दिलजीतला इशारा दिला. ही संघटना प्रचंड आक्रमक झाल्याचे
दिसत आहे.
‘रंगेहाथ..!’ गोविंदाच्या अफेअरबद्दल Sunit Ahujaने तोडले मौन; पतीकडे 5 BHK घराची मागणी करत म्हणाली…






